मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवल्यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंनी सरकारला लगावला टोला!

Raj-Thackeray-10

पत्रकारपरिषदेतील ‘त्या’  व्हायरल व्हिडीओवरून राज ठाकरेंनी  टिप्पणी केली आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज सतराव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी उपोषण सोडले. यावर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. Reacting to Manoj Jarange Patils hunger strike Raj Thackeray attacked the government

राज ठाकरे म्हणतात, ”मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो.”

याचबरोबर ”आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे, त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे, आणि ती योग्यच आहे. ह्या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल ह्यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा ह्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे.” असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

याशिवाय, ”गेले १७,१८ दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा. सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो.” असं म्हणत राज ठाकरेंनी चिमटा काढला आहे.

Reacting to Manoj Jarange Patils hunger strik Raj Thackeray attacked the government

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात