ठाकरे गटानं 10 नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी; विभागीय नेते जाहीर
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आली आली घंटागाडी म्हणत जशी रोज घंटागाडी येते, त्याच धर्तीवर आली आली, पुन्हा आली, ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची बातमी पुन्हा आली, असे म्हणायची वेळ उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या बातमीने आणली आहे. News of Thackeray’s visit to Maharashtra
उद्धव ठाकरे म्हणे, जानेवारी महिन्यात महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. अर्थात अशी बातमी येण्याची ही किमान तिसरी वेळ आहे. या आधी दोनदा उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याच्या बातम्या आल्या, पण प्रत्यक्षात दौरे झालेच नाहीत. त्याऐवजी आदित्य ठाकरे यांचा अर्धा दौरा झाला आणि त्यानंतर अधून मधून संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांचा दौरा होतो. पण शिवसेना फुटल्यानंतर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या 16 महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे घोषणा करूनही घराबाहेर पडून महाराष्ट्रात फिरल्याचे दिसले नाही.
पण आता 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने लोकसभेसाठी संघटनात्मक बांधणीवर भर देत विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे.
संघटनात्मक बांधणीसाठी ठाकरे गटाची नवी रचना करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे. ठाकरे गट अँक्शन मोडवर आला आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 10 नेत्यांवर राज्यातील विभागवार संघटनात्मक तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने विशेष जबाबदारी सोपवली आहे.
उद्धव ठाकरेंनी सर्वात आधी नेते मंडळात वाढ करून नेत्यांची संख्या वाढवली होती. आता या आता नेत्यांवर विभागवार बांधणीची जबाबदारी टाकून निवडणुकांच्या तयारीसाठी ठाकरे गटाने पुढचे पाऊल टाकले आहे.
उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भाची जबाबदारी 10 नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौरा आणि जाहीर सभांचे नियोजन सुद्धा लवकर जाहीर केले जाणार आहे. आत्तापर्यंत जाहीर झालेल्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्यांचे नेमके काय झाले??, याची खबरबात कोणाला लागलेली नाही.
कोणत्या नेत्याकडे कोणती जबाबदारी?
खासदार संजय राऊत
लोकसभा मतदारसंघ नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी, : पुणे, बारामती, शिरूर, मावळ (विधानसभा पिंपरी चिंचवड, मावळ)
अनंत गीते – कोकण (रायगड)
लोकसभा मतदारसंघ : रायगड, मावळ (विधानसभा पनवेल, कर्जत, उरण ) –
चंद्रकांत खैरे – मराठवाडा
लोकसभा मतदारसंघ : संभाजीनगर, जालना
खासदार अरविंद सावंत
पश्चिम विदर्भ
लोकसभा मतदारसंघ : बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ – वाशिम, वर्धा
खासदार अनिल देसाई – पश्चिम महाराष्ट्र
लोकसभा मतदारसंघ : सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी
आमदार सुनील प्रभू – मराठवाडा, सोलापूर
लोकसभा मतदारसंघ : सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड
आमदार भास्कर जाधव – पूर्व विदर्भ
लोकसभा मतदारसंघ : नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर
खासदार विनायक राऊत – कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग )
लोकसभा मतदारसंघ : रत्नागिरी, सिंधुदुर्ग
खासदार राजन विचारे – कोकण (ठाणे, पालघर )
लोकसभा मतदारसंघ : ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर
आमदार रवींद्र वायकर – मराठवाडा
लोकसभा मतदारसंघ – नांदेड, हिंगोली, परभणी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App