Rajasthan Election 2023 : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झाले ७० टक्के मतदान

काँग्रेस आणि भाजपा नेत्यांकडून सरकार स्थापणार असल्याचा दावा

विशेष प्रतिनिधी

जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली, ज्यामध्ये ७० टक्के मतदान झाले आहे. काही ठिकाणच्या तुरळक हिंसक घटना सोडल्या तर राज्यभरात मतदान शांततेत पार पडले. Rajasthan election 2023 ; 70 percent voting for assembly elections in Rajasthan

मुख्य लढत ही काँग्रेस आणि भाजपामध्येच असून, दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून जनादेश आम्हालाच मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. सर्वाधिक मतदान हे जैसलमेर जिल्ह्यात झाले.

हिंसक घटना घडल्या, तिथे पुन्हा मतदान घेण्याबाबतचा निर्णय पर्यवेक्षकांच्या अहवालानंतर घेतला जाणार आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत ७४ टक्के मतदान झाले होते.

कुठेही मतदान प्रक्रिया थांबल्याची माहिती समोर आली नाही. काही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड जाणवला परंतु ही संख्या कमी होती. सत्तारूढ काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी मतदान प्रक्रिया पार पडत असताना, माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत आपल्याच पक्षाला जनादेश मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

Rajasthan election 2023 ; 70 percent voting for assembly elections in Rajasthan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात