Rajasthan Election 2023 : जोधपूर जिल्हा प्रशासनाने मतदारांसाठी छापली लग्नपत्रिकेसारखी निमंत्रण पत्रिका!

सोशल मीडियावर होतेय तुफान व्हायरल!

विशेष प्रतिनिधी

जोधपूर : राजस्थान विधानसभेच्या 199 जागांसाठी आज (२५ नोव्हेंबर) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जोधपूर जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदानासाठी आवाहन म्हणून लग्न पत्रिकेच्या स्वरुपाताच एक आग्रहाची निमंत्रण पत्रिका छापली आहे. Rajasthan Election 2023 Jodhpur district administration printed an invitation card

जिल्हा निवडणूक अधिकारी सरदारपुरा, जोधपुर शह, सूरसागर, लूणी, ओसियां, लोहावट आणि फलौदीसह अनेक विधानसभा क्षेत्रांमधील मतदारांना हे लग्नपत्रिकेच्या स्वरुपातील मतदानासाठीचे निमंत्रण पत्रक दिले जात आहे.

एखाद्या लग्न पत्रिकेसारखीच ही निमंत्रण पत्रिक पूर्णपणे दिसत आहे आणि सध्या सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या या आग्रहाच्या निमंत्रणामुळे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारही उत्साही दिसत आहेत.

सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी चांगलाच जोर लावल्याचे दिसून आले आहे. आता मतदरांनी त्यांचा मतदानाचा हक्क जास्तीत जास्त संख्येने बजावा यासाठी त्यांना विविध मार्गाने आवाहन आणि विनंती केली जात आहे.

निमंत्रण पत्रिकेत काय?

निमंत्रण पत्रिकेद्वारे जोधपूर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, ” भेज रहे हैं स्नेह निमंत्रण, मतदाता तुम्हें बुलाने को, 25 नवंबर भूल न जाना, वोट डालने आने को!” याशिवाय या निमंत्रण पत्रिकेत मतदानाची वेळ, तारीख, दिनांक, ठिकाणाबाबतही सांगण्यात आले आहे.

Rajasthan Election 2023 Jodhpur district administration printed an invitation card

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात