18 मालमत्तांचा आहे समावेश आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या कंपन्यांच्या 71 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 18 मालमत्ता बँक आणि लिक्विडेटर्सच्या ताब्यात द्याव्यात आणि त्यांना विक्री करण्याचा अधिकार द्या, असे निर्देश विशेष न्यायालयाने बुधवारी दिले. PNB Scam Court orders sale of Nirav Modis property worth 71 crores
बँकेने एक दावेदार आणि बँकांचे संघ प्रतिनिधी या नात्याने, ईडीने जप्त केलेल्या काही मालमत्तेवर दावा करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीच्या कृत्यांमुळे 7,000 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे असे सांगितले होते.
बँकेने तारण, गहाण आणि जप्ती यापासून मुक्त, सुरक्षित असलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हाँगकाँग आणि दुबई येथून जप्त करण्यात आलेल्या इंडिया डायमंड बोर्सच्या कस्टोडियनच्या ताब्यातील मौल्यवान वस्तूंसह 18 मालमत्तांचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App