विषारी दारुमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून जीतन राम मांझींचा नितीश कुमारांवर हल्लाबोल, म्हणाले…

थोंडं थोडं मरण देण्यापेक्षा जनर डायरसारखं….असंही मांझी यांनी म्हटलं आहे.


विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये काही संशयास्पद मृत्यू झाले आहेत. याबाबत बुधवारी (२२ नोव्हेंबर) जीतन राम मांझी यांनी निवेदन दिले आणि नितीश कुमार यांना म्हणाले की, ”थोडं, थोंड का मरण देत आहात. जनरल डायरसारखं सर्वांना रांगेत उभा करा आणि गोळ्या घाला.”Jitan Ram Manjhi attacks Nitish Kumar over deaths due to toxic liquor



जीतन राम मांझी यांनी बुधवारी सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिले, “नितीश कुमार विषारी दारूच्या नावाखाली गरिबांना थोडं थोडं मरण का देत आहेत? त्यांना जनरल डायर प्रमाणे रांगेत उभे करा आणि सर्वांना एकदाच गोळ्या घाला. तुमचा द्वेष संपुष्टात येईल.

तसेच विषारी दारूमुळे मृत्यू होत आहेत. जर तुम्ही हे थांबवू शकत नसाल तर दारूबंदी कायद्याचा अर्थ काय? किमान गुजरातपासून तरी धडा घ्या.असंही मांझी यांनी नितीश कुमारांना उद्देशून म्हटलं आहे.

खरं तर, याच महिन्यात सीतामढीमध्ये छठपूर्वी पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. दारू पिऊन मृत्यू झाल्याचे गावकरी बोलत होते. मात्र प्रशासन काही वेगळेच सांगत होते. तसेच गोपालगंजमध्येही पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र या प्रकरणी गोपालगंज जिल्हा प्रशासनाने याचा इन्कार केला असून या सर्वांचा मृत्यू वेगवेगळ्या आजारांमुळे झाल्याचे म्हटले आहे.

Jitan Ram Manjhi attacks Nitish Kumar over deaths due to toxic liquor

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात