‘डीपफेक’ व्हिडीओवर सरकारने बोलावली उच्चस्तरीय बैठक

गुगल-मेटाचा समावेश, जाणून घ्या काय असेल पुढची तयारी Government called a high level meeting on Deepfake video

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीपफेक फोटो आणि व्हिडिओंचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी या मुद्द्यावर बैठक बोलावली आहे. मंत्री अश्विनी वैष्णव आणि राजीव चंद्रशेखर आणि मंत्रालयाचे उच्च अधिकारी या बैठकीला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

या बैठकीत फेसबुक-इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटा आणि गुगलसह विविध पक्षांना बोलावण्यात आले आहे. गेल्या शुक्रवारी भाजपच्या मुख्यालयात आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी बनावट डीपी व्हिडिओंच्या प्रसाराबाबत सतर्क राहण्यास सांगितले होते. त्यांनी नुकत्याच घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला, जिथे एका व्हिडिओमध्ये पंतप्रधानांना डीपफेक व्हिडिओद्वारे बनावट पद्धतीने गरबा करताना दाखवण्यात आले होते.

अलीकडेच, साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिचा एक बनावट व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यानंतर बॉलिवूडपासून राजकीय वर्तुळात याविषयी बराच वाद झाला होता. चुकीची माहिती आणि डीपफेकमुळे निर्माण होणारी आव्हाने लक्षात घेता, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गेल्या सहा महिन्यांत दुसरी अॅडव्हायजारी जारी केली, ज्यात ऑनलाइन प्लॅटफॉर्मना डीपफेकच्या प्रसाराविरुद्ध निर्णायक कारवाई करण्याचे आवाहन केले.

Government called a high level meeting on Deepfake video

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात