राहुल गांधी गाढे अभ्यासू ज्योतिषी आहेत हे समस्त भारतीयांना माहिती नव्हते, ते कालच समजले!!

राहुल गांधी हे नेहरू गांधी खानदानाचे “युवराज” आहेत. अमेठीतून पराभूत झालेले, पण वायनाड मधून निवडून आलेले काँग्रेसचे खासदार आहेत. 3000 किलोमीटर चाललेले आणि उर्वरित 2500 किलोमीटर चालणारे महापदयात्री आहेत. समस्त भारतीय आणि परदेशस्थ बुद्धिवाद्यांच्या “आँखों का तारा” आहेत. राहुल गांधींची एवढीच ओळख आत्तापर्यंत भारतीयांना होती!! Satirical article on rahul gandhi’s strictures on PM Modi as “panauti”

पण ते मोठे गाढे अभ्यासू ज्योतिषी, भविष्यवेत्ते आहेत हे कुणा भारतीयांना माहितीच नव्हते. राहुल गांधींच्या भारतीय आणि परदेशस्थ बुद्धिवादी समर्थकांनी त्यांची “तशी” ओळखच भारतीयांना होऊच दिली नव्हती. “महाज्योतिषी” राहुल गांधी ही ओळख त्यांनी समस्त भारतीयांपासून लपवून ठेवली होती, पण अखेर स्वतःच्याच “सिद्ध मुखातून” राहुल गांधींनी आपण स्वतः महान ज्योतिषी असल्याची ओळख समस्त कालच भारतीयांना पटवून दिली.

काल दुपारी राजस्थानात बारमेर मध्ये काँग्रेसच्या प्रचार सभेत केलेल्या भाषणात राहुल गांधी, “PM मतलब पनौती मोदी” असे म्हणाले काय आणि सायंकाळी राहुल गांधींनी ती भविष्यवाणी सिद्ध झाली काय!! सगळेच अतर्क्य आश्चर्याचे काम!! समस्त भारतीयांनी आपापल्या तोंडात आपापलीच बोटे घालावीत अशी “भविष्यवाणी” काल सायंकाळी खरी ठरली!!

PM मोदी खरंच पनौती ठरले की… पण ते भारतीय टीम साठी नाही किंवा बाकीच्या भारतीयांसाठी नाही, तर खुद्द गांधी परिवारासाठी PM मतलब पनौती मोदी ठरले!!

21.11.2023 काल सायंकाळीच या पनौतीची बातमी आली. ED ने सायंकाळी 6.50 वाजता एक ट्विट केले. त्यानुसार ED ने गांधी परिवाराला दणका देत AJL अर्थात असोसिएटर जर्नल्स लिमिटेड आणि YI अर्थात यंग इंडियन या दोन कंपन्यांची तब्बल 751.9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. गेली 12 वर्षे कोर्टात केस असलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणातली ही कारवाई होती.

शिवाय ही अंतिम कारवाई नाही. ही मधल्या टप्प्यातली कारवाई आहे. अंतिम कायदेशीर कारवाई अजून व्हायची आहे. नॅशनल हेराड मनी लॉन्ड्रीग प्रकरणात सर्व कायदेशीर कलमे कोर्टात सिद्ध झाली, तर 23 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, अशी पुढची माहिती आहे… असो!!

…पण बघा हे सगळे घडले केव्हा??, तर काल, ज्या दिवसाच्या दुपारी राहुल गांधी PM मतलब पनौती मोदी, असे म्हणाले त्यानंतर!! गेल्या 12 वर्षांतला दुसरा कोणताही “मुहूर्त” त्यासाठी नियतीने निवडलाच नाही!! हे नेमके राहुल गांधींना त्यांच्या ज्योतिष विषयक आघाध ज्ञानातून समजले होते. त्यामुळेच बारमेर मधल्या प्रचार सभेत त्यांच्या “सिद्ध मुख” तोंडून उत्स्फूर्त उद्गार निघू शकले, PM मतलब पनौती मोदी!!… आणि ते काल सायंकाळी सिद्ध झाले!!

आता एवढे मोठे प्रत्यंतर आल्यानंतर मग राहुल गांधींना ज्योतिष विषयक ज्ञान नाही, असे कसे म्हणायचे?? तसे म्हणायला आपण राहुल गांधींचे बुद्धिवादी समर्थक थोडेच आहोत??, आपण तर अतिसामान्य भारतीय नागरिक आहोत. त्यामुळे राहुल गांधी हे गाढे अभ्यासू ज्योतिषी आहेत हे आपण मान्य करायलाच हवे!!… आता आपल्या “सिद्ध मुखातून” ते पुढची भविष्यवाणी कोणती, केव्हा आणि काय करतात??, याकडे समस्त भारतीय डोळे आणि कान लावून बसले आहेत!!

Satirical article on rahul gandhi’s strictures on PM Modi as “panauti”

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात