अंतिम सामना वानखेडे मैदानावरच व्हायला हवा होता! दोघांनी व्यक्त केलं मत!
विशेष प्रतिनिधी
पुणे : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल झालेला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक 2023 हा सामना करोडो भारतीयांचं स्वप्न , आशा मोडणारा ठरला . काल प्रत्येक क्रिकेट प्रेमी आणि भारतीयांच्या डोळ्यात अश्रू तरळे संपूर्ण स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने धडाकेबाज कामगिरी केली. सलग १० सामने जिंकले. मात्र अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडने ठोकलेल्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने भारतीय संघाचा पराभव केला. World cup match 2023 Marathi kalakar news
ऑस्ट्रेलियाने २४१ धावांचं लक्ष्य ४३ षटकात ६ विकेट्स शिल्लक असताना सहज गाठलं. त्यामुळे भारताला मोठा धक्का बसला. भरमैदानात भारतीय क्रिकेटर्सना अश्रू अनावर झाले. सध्या सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींच्या समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण कर्णधार रोहित शर्मा कुठे चुकला याविषयी बोलत आहेत, तर काही जण भारतीय संघाला अजूनही पाठिंबा देत आहेत. अनेक मराठी कलाकारांनी अंतिम सामना हा वानखेडेलाच झाला पाहिजे होता असं मत व्यक्त केलं आहे.
अनेक मराठी कलाकार काल अहमदाबाद मध्ये प्रत्यक्ष सामना बघण्यासाठी पोहोचले होते. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे तिने देखील आपल्या समाज माध्यमातून आमदाबाद येथील काही क्षणचित्रे आणि सामन्याचे तिकीट शेअर केलं होत. तर काही कलाकारांनी घरी बसूनच टीव्हीवर सामना बघितला
पण भारताच्या पराभवानंतर बऱ्याच मराठी कलाकारांनी नाराजी व्यक्ती केली. काही जणांनी टीव्ही बंद केला, अशी इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकली, तर काही जणांनी भावुक इमोजी स्टोरीला शेअर केले.
अभिनेता अभिनय बेर्डे आणि अभिनेत्री अन्विता फलटणकर यांनी अंतिम सामना वानखेडेलाच झाला पाहिजे असं मत व्यक्त केलं. दोघांनी या आशयाची इन्स्टाग्रामला स्टोरी शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App