रोहितच्या डोळ्यात अश्रू, भारतभर सन्नाटा; पंतप्रधान मोदींचे मनोधैर्य उंचावणारे ट्विट!!


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : क्रिकेट वर्ल्ड कपच्या सलग 10 सामन्यांमध्ये विलक्षण प्रतिभा दाखवून खेळ केलेल्या भारतीय टीमला फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे कर्णधार रोहित शर्माच्या डोळ्यात अश्रू दाटले. ते पाहून 140 कोटी जनतेच्या डोळ्यातही अश्रू आले. भारताच्या पराभवामुळे संपूर्ण देशभर रविवारी रात्री सन्नाटा होता.  Tears in Rohit’s eyes, silence across India; Prime Minister Modi’s morale-boosting tweet

पण या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय टीमच्या कामगिरीचे कौतुक करणारे आणि समस्त भारतीयांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी ट्विट केले आहे.

संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय टीमने अतिशय प्रतिभाशाली खेळ दाखवत विजयी वाटचाल चालू ठेवली होती. अत्यंत खिलाडू वृत्तीने तुम्ही सर्व सामने खेळतात आणि विजयी झालात. भारताला तुम्ही गौरव मिळवून दिलात. आम्ही सर्व भारतीय आज आणि सदैव भारत टीमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा विश्वास देणारे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.

वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय टीमने सलग दहा सामने जिंकून फायनल मध्ये प्रवेश केला होता. परंतु फायनल मध्ये आपली फारशी चमक टीमला दाखवत आली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला. पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियन टीमचे अभिनंदन केलेच आहे, पण त्याच वेळी भारतीय टीमचे देखील खास कौतुक करून त्यांच्या पाठीशी आपण ठाम उभे असल्याचा विश्वासही समस्त भारतवासीयांना दिला आहे.

Tears in Rohit’s eyes, silence across India; Prime Minister Modi’s morale-boosting tweet

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात