जाणून घ्या काय आहे या स्टेडियमची खासियत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: आज म्हणजेच १९ नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा शानदार सामना होणार आहे. या सामन्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे, तर भारतीय चाहते मैदानातून सामना थेट पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. World Cup Final match between India and Australia today at Narendra Modi Stadium
आज या स्टेडियममध्ये १ लाख ३२ हजार क्रिकेट चाहत्यांची गर्दी होणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही अंतिम सामना पाहण्यासाठी मैदानावर प्रेक्षकांमध्ये सहभागी होणार आहेत. यात अनेक बिझनेस मेन आणि बॉलीवूड सेलिब्रिटीही दिसणार आहेत.
मैदानाची वैशिष्ट्ये काय? –
नरेंद्र मोदी स्टेडियम हे गुजरात राज्याची राजाधानी असलेल्या अहमदाबाद शहरात आहे. हे स्टेडियम भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचे असून येथे अनेक महत्त्वाच्या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. मोटेरा स्टेडियम 1982 मध्ये बांधले गेले आणि ते भारतीय क्रिकेट संघटनेचे प्रमुख ठिकाण बनले आहे. मात्र, या स्टेडियममध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. 2020 मध्ये या स्टेडियमचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात आले आणि त्याचे आधुनिक, जागतिक दर्जाचे स्टेडियममध्ये रूपांतर करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरून या स्टेडियमचे नवीन नामकरण करण्यात आले असून आता त्याचे नाव ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी, हे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमपैकी एक आहे आणि आता यामध्ये एकाचवेळई तब्बल1,32,000 प्रेक्षक बसून क्रिकेट मॅचचा आनंद घेऊ शकतात. म्हणजेच आज आयोजित करण्यात आलेला अंतिम सामना हा एखाद्या मोठ्या घटनेपेक्षा कमी नाही.
या स्टेडियमच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे म्हटले तर, हे स्टेडियम अतिशय आधुनिक आणि सर्वसमावेशक सुविधांनी सुसज्ज आहे. ज्यामध्ये उच्च दर्जाच्या भोजन सुविधा, मोठ्या संख्येने ठिकाणे आणि विविध खेळांसाठी उपयुक्त अशा अनोख्या पायाभूत सुविधांचा समावेश आहे. या स्टेडियममध्ये अनेक महत्त्वाच्या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यातील एक महत्त्वाचा क्षण म्हणजे 2020 मध्ये येथे टेस्ट मॅच आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये भारताने इंग्लंडचा पराभव केला होता. म्हणजेच आज 19 नोव्हेंबरला पुन्हा एकदा हे स्टेडियम एका मोठ्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App