या घटनेतील पीडित आणि मृत्यू झालेल्या तरुणीच्या आईने याबाबत माहिती दिली आहे.
विशेष प्रतिनिधी
गाझा : ऑक्टोबर २०१५ मध्ये हमासच्या हल्लेखोरांनी इस्रायलवर हल्ला करून अनेकांना ठार केले. यावेळी हमासने एका संगीत महोत्सवातून जर्मन-इस्त्रायली वंशाच्या 22 वर्षीय तरुणीचे अपहरण केले, तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिची हत्या करून गाझामध्ये तिचे नग्न शरीर उघड्या जीपमधून फिरवले होते. IDF took revenge German-Israeli girl killed by Hamas terrorist who drove her naked in a jeep
या क्रूर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर संपूर्ण जगभरातून संताप व्यक्त केला गेला होता. अखेर आता इस्त्रायली सैन्याने या हमासच्या या कृत्याचा बदला घेतला आहे.
सध्या अनेक सोशल मीडियावरून बातम्या येत आहेत की त्या घटनेतील मृत तरुणी शनीची आई रिकार्डा ल्यूक यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत खुलासा केला आहे की इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने त्यांच्या मुलीची हत्या करणाऱ्या हमासच्या दहशतवाद्याला ठार केले आहे.
गेल्या महिन्यात इस्रायलमधील एका संगीत महोत्सवावर हमासच्या सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे 260 लोक मारले गेले होते. यावेळी जर्मन-इस्त्रायली महिला शनी लूकचे अपहरण केले गेले, तिचा पाय तोडला आणि तिच्यावर अत्याचार केले. केवळ एवढे करून ते नराधम थांबले नाहीत तर त्यांनी संपूर्ण गाझामध्ये जखमी आणि नग्न अवस्थेत तिची परेडही काढली. अखेर महिलेची नग्न परेड करणाऱ्या एका दहशतवाद्याला ठार केल्याचा दावा आयडीएफने केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App