राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची??,पवारांची की अजितदादांची??; आज सोमवारपासून नियमित सुनावणी!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाची शरद पवारांची की अजित पवारांची पक्षावर वर ताबा कुणाचा??, या मुद्द्यावरून सुरू असलेल्या संघर्षावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज सोमवारपासून (20 नोव्हेंबर) नियमित सुनावणी होणार आहे. national rashtravadi congress ajit pawar or sharad pawar

शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी पक्षावर आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावर दावा सांगितला असल्याने आयोग कोणाच्या बाजूने कौल देणार??, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे सलग तिसऱ्या सुनावणीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगापुढे 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. त्यात शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी 2 तास युक्तिवाद केला होता. त्यात त्यांनी अजित पवार गटावर अनेक गंभीर आरोप केले होते. अजित पवार गटाने खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केली असल्याचा आरोप त्यांनी युक्तीवादात केला होता. मृत्यू झालेल्या लोकांची प्रतिज्ञापत्रे, अल्पवयीन मुलांची प्रतिज्ञापत्रे अजित पवार गटाने दाखल केल्याचा दावा सिंघवी यांनी केला. अजित पवार यांच्याकडे काहीच समर्थन नसल्याचा त्यांनी दावा केला होता. अजित पवार गटाने खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेतील कलम संबंधितांविरोधात लावली जावीत, अशी मागणीही सिंघवी यांनी केली होती.

अजित पवार गटाने केली ही मागणी

अजित पवार गटाने सलग सुनावणी व्हावी, अशी मागणी केली. त्यामुळे 20 नोव्हेंबरपासून सलग सुनावणी सुरु होण्याची शक्यता आहे. सुनावणीत काही तांत्रिक गोष्टी आम्ही आयोगासमोर आणणार आहोत, असे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे नवी दिल्लीत आज पासून होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

national rashtravadi congress ajit pawar or sharad pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात