प्रतिनिधी
नाशिक : मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे पाटील यांचे सावरकरांची जन्मभूमी भगूर गावात जोरदार स्वागत झाले. मराठा समाजाने जरांगे पाटलांची भव्य मिरवणूक काढली. भगूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला मनोज जरांगे पाटलांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. Savarkar’s birthplace Bhagur received a warm welcome from Jarange Patil
मनोज जरांगे पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले आणि तेथील पुरोहितांकडे जाऊन त्यांच्याकडे असलेल्या वंशावळीच्या दस्तऐवजांमधील काही कुणबी नोंदी पाहिल्या.
त्यानंतर मनोज जरांगे पाटील स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी भगूर गावात आले. तेथे मराठा समाजाने त्यांची भव्य मिरवणूक काढली. भगूरच्या मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचबरोबर त्यांचे इगतपुरी मध्ये देखील जोरदार स्वागत झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App