विशेष प्रतिनिधी
पुणे : Mahayuti candidates महायुतीच्या उमेदवारांना पोलिसांच्या गाड्यांमधून रसद पुरवली जाते, असा गंभीर आरोप शरद पवारांनी केला पण पवारांना त्यांच्याच काळातले भास होत असल्याचा प्रत्यारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांची अशी जुगलबंदी रंगली.Mahayuti candidates
महाराष्ट्र मध्ये पोलिसांच्या तिथे त्यांच्या छाप्यांमध्ये करोडो रुपयांची रक्कम सोन्याची बिस्किटे आढळली या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बारामतीतल्या पत्रकारांशी बोलताना थेट महायुती सरकारवर आरोप केला पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद मिळत असल्याची माहिती मला मिळाली आहे, असा दावा त्यांनी केला. यासाठी त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतल्या गृहमंत्री पदाच्या उपकारकिर्दीचा उल्लेख केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर पत्रकारांनी त्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारला त्यावेळी फडणवीस यांनी त्यांच्याच काळात अशा प्रकारची रसद पुरवली जात होती. असं लोक सांगतात त्यामुळे त्यांना त्यांच्या काळातले भास होत असावेत, असा टोला फडणवीस यांनी पवारांना हाणला.
70000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याची फाईल दाखवून देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना 10 वर्षे ब्लॅकमेल केले, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. तो फडणवीसांनी उडवून लावला. जयंत पाटील सतत मस्करी करत असतात. त्यामुळे तुम्ही त्यांना सिरियसली घेऊ नका, असा सल्ला फडणवीसांनी पत्रकारांना दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App