विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ghatkopar Parag Shah राज्यातील विविध पक्षांतील उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. यामध्ये घाटकोपर पूर्वमधील भाजपचे उमेदवार पराग शहा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या मंगलप्रभात लोढांना मागे टाकले आहे.Ghatkopar Parag Shah
२०१९ मध्ये घाटकोपर पूर्वमधून प्रथमच विजयी झालेल्या शहा यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत ५७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. घाटकोपर पूर्व मतदारसंघातून शहा यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात त्यांची एकूण संपत्ती ३३८३.०६ कोटी रुपये आहे. शहा गेल्या वेळी ५३,३१९ मतांनी विजयी झाले होते.
Manoj Jarange मौलाना सज्जाद नोमानींना मनोज जरांगेंमध्ये “दिसले” गांधी + आंबेडकर आणि मौलाना आझाद!!
मी ५०% रक्कम दान करतो : शहा
दरम्यान, मी ५० टक्के रक्कम दान करतो, असा दावा शहा यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, अनेक लोकांकडे पैसा आहे, पण मला त्याचा चांगला वापर करायचा आहे. देशाने मला सर्व काही दिले आहे, त्यामुळे मीही काहीतरी दिले पाहिजे असे मला वाटते.
मंगलप्रभात लोढा यांची संपत्ती किती?
२०१९ मध्ये दक्षिण मुंबईतील भाजप उमेदवार, मंत्री, बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा सर्वात श्रीमंत होते. यंदाच्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार आता त्यांच्याकडे ४३६ कोटी ८० लाख ४८ हजार ५९१ रुपयांची संपत्ती आहे.
पाच वर्षांत पराग शहांची संपत्ती ५५० कोटींवरून ३३८५ कोटींवर
२०१९ विधानसभा निवडणुकीत पराग शहा यांनी आपली संपत्ती ५५०.६२ कोटी असल्याचे जाहीर केले होते. शहा रिअल इस्टेट क्षेत्रात सक्रिय आहेत. ते नगरसेवकही राहिले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App