सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र बंदचा उडाला फज्जा ; कणकवलीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक दुकाने सुरु


विशेष प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : कणकवली महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘हरताळ’ फासला गेला आहे. ८०% पेक्षा अधिक दुकाने सुरू असून कणकवलीत बंदला फारसा प्रतिसाद लाभला नाही.Maharashtra bandh blows up in Sindhudurg district; More than 80% shops started in Kankavali

उत्तरप्रदेश लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मात्र जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या कणकवली बाजारपेठेत याचा फारसा परिणाम जाणवला नाही.



व्यापारी मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाले आहेत. तर काही ठिकाणी जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला थंड प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दुकानदारांना बंदात सहभागी आवाहन केले होते. मात्र, काही ठरावीक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली होती.

कणकवलीत मात्र, महाविकास आघाडीने दुकाने बंद करायला भाग पाडले. पण, त्यालाही अत्यल्प प्रतिसाद मिळला. कणकवलीत महाविकास कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि बाजारपेठेत फेरफटका मारत दुकान बंद करायला लावली.

यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने दुकाने बंद केली. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत नेतृत्व केलं. एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंदचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र आहे.

Maharashtra bandh blows up in Sindhudurg district; More than 80% shops started in Kankavali

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात