भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या महाराष्ट्र बंद वरुन महविकस आघाडी सरकार वर आरोप केला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : आज महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. पुणे शहरात देखील हा बंद पाळण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या पुणे शहरातील नेत्यांनी बाईक रॅली तसेच पदयात्रा काढत व्यापाऱ्यांनी बंद पाळण्याचे आवाहन केलं आहे. BJP city president Jagdish Mulik calls off Mahavikas Aghadin by abusing government machinery in Pune
भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या महाराष्ट्र बंद वरुन महविकस आघाडी सरकार वर आरोप केला आहे. मुळीक म्हणाले की ,”पुणे शहरात शासकीय यंत्रणेचा गैरवापरकरून महाविकास आघाडीकडून बंद करण्यात आला आहे. हा बंद शेतकऱ्यांसाठी नसून मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघडकीस येत असल्याने लक्ष विचलित करण्यासाठी करीत आहेत.”
पुढे मुळीक यांनी पुणेकरांना आवाहन केलं आहे की , आघाडीच्या नेत्यांकडून दमदाटी करत दुकाने बंद करायला भाग पाडल जात आहे.कोणाला अशाप्रकारे दमबाजी केली जात असेल तर पुणेकरांनी भाजप लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा.तसेच भाजप पुणेकरांच्या पाठीशी असून कोणीही गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करता येईल, असंही मुळीक यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App