धर्म आणि कुटुंब व्यवस्थेविषयी मूल्यशिक्षण देऊन हिंदूंनी स्वतःचे धर्मांतर रोखले पाहिजे; मोहन भागवत यांचे परखड मत


विशेष प्रतिनिधी

डेहराडून : हिंदू कुटुंबांनी हिंदू धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे, स्वधर्मातील परंपरा जपल्या पाहिजेत. कुटुंब व्यवस्थेविषयी मूल्य शिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. Hindus should prevent their own conversion by imparting values ​​about religion and family system; Mohan Bhagwat’s strong opinion

हिंदू धर्मीय छोट्याशा स्वार्थापोटी धर्मांतर करून घेतात, हा स्वार्थ म्हणजे विवाह! विवाहासाठी हिंदू स्वतःचे इतर धर्मात धर्मांतर करून घेतात, त्यामुळे हिंदू कुटुंबांनी स्वधर्माचा अभिमान बाळगून धर्मांतर रोखले पाहिजे, असे विधान देखील त्यांनी उत्तराखंड येथील एका कार्यक्रमात केले.

स्वधर्माचा अभिमान बाळगा!

हिंदू कुटुंबांनी हिंदू धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे, स्वधर्मातील परंपरा जपलेल्या पाहिजेत, मूल्य शिक्षण दिले पाहिजे, असे सांगत धर्मांतर कसे काय होते? आपल्या देशातील मुले, मुली इतर धर्मात कसे काय जातात? छोट्या छोट्या स्वार्थांसाठी, लग्न करण्यासाठी धर्मांतर करतात, हे चुकीचे आहे, हा मुद्दा वेगळा आहे. पण आपण आपली मुले तयार करत नाही, या मुद्द्याकडे डॉ. भागवत यांनी आवर्जून लक्ष वेधले.



संघाच्या कार्यक्रमात ५० टक्के महिला दिसाव्यात!

मोहन भागवत यांनी यावेळी संघाच्या कार्यक्रमांमध्ये फक्त पुरुषच दिसतात हा मुद्दाही उपस्थित केला. हिंदू समाज संघटित करणे हाच आरएसएसचा मुख्य हेतू आहे. पण जेव्हा आम्ही आरएसएसचे कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा आम्हाला फक्त पुरुषच दिसतात. जर संपूर्ण समाज संघटित करायचा असेल तर यामध्ये ५० टक्के महिला असल्या पाहिजेत, असेही भागवत यांनी म्हटले.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्व काही पहायला मिळते. आपणच मुलांना घरात काय पहायला हवे आणि काय नको हे शिकवण्याची गरज आहे, लोकांना आपले गुलाम बनवण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी चीनमध्ये ओपियम पाठवले. तरुण त्याच्या आहारी गेले आणि पाश्चिमात्य देशांनी चीनवर राज्य केले. आपल्या देशातही हेच सुरु आहे. जेव्हा तुम्ही ड्रग्ज प्रकरणे पाहता आणि ते कुठून येतात हे पाहिले तर ते का, कशासाठी येत आहेत आणि याचा कोणाला फायदा होत आहे हे तुम्हाला समजेल, असेही भागवत म्हणाले.

Hindus should prevent their own conversion by imparting values ​​about religion and family system; Mohan Bhagwat’s strong opinion

महत्त्वाच्या बातम्या

आज राज्यात महाराष्ट्र बंद ची हाक ; महविकास आघाडीची जोरदार तयारी , या सेवांवर होणार ‘बंद’ चा परिणाम

विज्ञानाची गुपिते : चुंबकीय लहरींमुळे सौरडागांवरील प्रभामंडळ उष्ण

विज्ञानाचे डेस्टीनेशन :कोरोनाविरोधात दोन प्रतिपिंडांचा प्रयोग प्रभावी

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात