अण्णा हजारेंचा आज ९० वा वाढदिवस; सेंच्युरी पूर्ण करायचा विश्वास; एकनाथ शिंदेंबरोबर व्हिडिओ कॉल!!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी येथे आज भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णांशी व्हिडिओ कॉलद्वारे साधून त्यांना शतायुषी व्हा, असे सांगत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. Anna Hazare

यावेळी बोलताना शिंदे यांनी “अण्णा, तुम्हाला आता शतक पूर्ण करायचे आहे. तुमच्या मार्गदर्शनामुळे आणि आशीर्वादामुळे राज्याची प्रगती चांगल्या दिशेने होत आहे. समाजासाठी केलेले तुमचे कार्य प्रेरणादायी असून पुढील अनेक वर्षे आम्हाला तुमचे मार्गदर्शन लाभावे,” अशा शब्दात त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी अण्णा हजारे यांनीही या शुभेच्छांचा विनम्रपणे स्वीकार करून आपल्या शुभेच्छामुळे मी नक्की सेंच्युरी पूर्ण करेन, असा विश्वास व्यक्त केला. तसेच आपल्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धीमध्ये आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल आरोग्यदूत फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आभार मानले.

– राळेगण मध्ये शिवसेनेचे आरोग्य शिबिर

आज आयोजित केलेल्या शिबिरामध्ये जनरल तपासणी, हृदयरोग तपासणी, ईसीजी, रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, मोफत नेत्रतपासणी, चष्मे वाटप, सांधेदुखी आणि गुडघेदुखी तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांसह ज्येष्ठ नागरिकांना वॉकिंग स्टिकचे वाटपही करण्यात आले. याशिवाय दोन दिवसीय भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास पाच लाख रुपयांचे मोफत अपघाती विमा संरक्षण देण्यात येणार आहे.

यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, विविध रुग्णालयांचे नामांकित डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी तसेच अण्णांचे सर्व सहकारी आणि राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Today is Anna Hazare’s 90th birthday.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात