अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचे छापे; देशमुख मात्र कुटुंबीयांसह गायब??

वृत्तसंस्था

नागपूर : मुंबईतील रेस्टॉरंट आणि बार चालकांकडून शंभर कोटींची वसुली करण्याच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने छापे घातले आहेत. सीबीआयची टीम सकाळपासून दाखल झाली असून तिचे 5 – 6 अधिकारी घराची झडती घेत आहेत. परंतु अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय घरात उपस्थित नसल्याचे समजते आहे. CBI raids Anil Deshmukh’s house; Deshmukh just disappeared with his family ??

एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विट केले आहे. सीबीआयची टीम अनिल देशमुख यांच्या घराची झडती घेतानाचा फोटोही एएनआयने शेअर केला आहे.



अनिल देशमुख यांना आत्तापर्यंत सक्तवसुली संचालनालय अर्थात इडी किमान सहा वेळा चौकशी आणि तपासासाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे. परंतु, त्यांनी या नोटिशीला प्रतिसाद दिलेला नाही. तसेच ते नेमके कोठे आहेत याचाही थांगपत्ता लागत नाही.

मध्यंतरी इडीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी अनिल देशमुख यांच्या घरी झडती घेतली त्यावेळी त्यांची दोन मुले आणि पत्नी हजर असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आज जेव्हा सीबीआयचे पथक अनिल देशमुख यांच्या घरी पोहोचले आहे तेव्हा ते आणि त्यांचे कुटुंबीय तेथे नव्हते ते नेमके कोठे आहेत याची कोणालाही माहिती नाही. त्यांचा तपास सुरू आहे.

CBI raids Anil Deshmukh’s house; Deshmukh just disappeared with his family ??

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात