जम्मू -काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जेसीओसह 5 जवान शहीद झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाची मोहीम जंगलात सुरू होती. यादरम्यान, एक जेसीओ आणि 4 लष्करी जवान गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण वाचवण्यात यश आले नाही. ते पाचही जवान शहीद झाले आहेत. Jammu Kashmir Rajouri Terrrotist Encouner Update; Four Amry Jawan MartyredIn Action During Operation
वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू -काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जेसीओसह 5 जवान शहीद झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाची मोहीम जंगलात सुरू होती. यादरम्यान, एक जेसीओ आणि 4 लष्करी जवान गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण वाचवण्यात यश आले नाही. ते पाचही जवान शहीद झाले आहेत.
सुरक्षा दलांना मुगल रोडजवळ दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे इनपुट मिळाले होते. यानंतर सुरक्षा दलांनी येथे ऑपरेशन सुरू केले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. यादरम्यान पाचही जवान शहीद झाले. लष्करानेही निवेदन जारी करून याला दुजोरा दिला आहे.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून चामेर जंगलात पोहोचले होते. त्यांना जंगलाबाहेर जाऊ नये म्हणून संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला आहे. अजूनही चकमक सुरू आहे आणि जंगलात तीन ते चार दहशतवादी लपल्याची शक्यता आहे.
दहशतवाद्यांविरोधात लष्कराचे ऑपरेशन आज सकाळपासून सुरू आहे. आज सकाळी सुरक्षा दलांनी अनंतनाग आणि बांदीपोरा येथे प्रत्येकी एका दहशतवाद्याला ठार केले. अनंतनागमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची माहिती अद्याप उपलब्ध नाही. अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. पण बांदीपोरामध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव इम्तियाज दार होते, जो लष्कर-ए-तैयबा (टीआरएफ) या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App