भगवान भक्तिगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी सांगितली व्यक्तीनिरपेक्ष संघटना महतीची गोष्ट!!


प्रतिनिधी

बीड : आज सगळीकडे दसरा मेळाव्यांची धूम असताना त्यातल्या एका मेळाव्यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे भाषण झाले. भगवान भक्तिगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी व्यक्तीपेक्षा संघटन मोठे असते, असे स्पष्ट करून संघटना महतीची गोष्ट सांगितली. 2019 च्या विधानसभा निवडणुकतील पराभवानंतर पंकजा मुंडे सातत्याने नाराजीच्या बातम्यांवरून चर्चेत राहिल्या आहेत. मात्र, आजच्या दसरा मेळाव्यात त्यांनी आपल्या नाराजीच्या बातम्यांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच त्यांनी आपण अशा पक्षाचा वारसा सांगतो त्यामध्ये व्यक्ती पेक्षा संघटना मोठी आहे अशी शिकवण मिळते, असे स्पष्ट केले. या भाषणातून पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना मोठा राजकीय संदेश दिल्याचे मानले जात आहे. In the Dussehra gathering at Bhagwan Bhaktigarh, Pankaja Munde told about the importance of non-personal organization.

सावरगावच्या भगवान भक्तिगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा विराट दसरा मेळावा झाला. पंकजा यांच्या समर्थकांनी भगवान भक्तिगडावर त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर फुलांची उधळण केली. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी माझा मेळावा चिखल फेकणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे, आमचा जन्मच संघर्षासाठी झालाय. वैयक्तिक टीका टिप्पणी करणं आमच्या रक्तात नाही, असं सांगत पुढील भाषणाची दिशा त्यांनी स्पष्ट केली.

कार्यकर्त्याची घोषणा, पंकजा मुंडेंनी दटावलं!

पंकजा भाषणाला उभ्या राहिल्यापासून कार्यकर्ते सतत घोषणा देत होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांना भाषण करतावेळी सतत डिस्टर्ब होत होतं. आता बस्स.. आता बस्स.. म्हणत पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना सूचना करत होत्या. पण एवढं सगळं होऊनही एका कार्यकर्त्याने मोठ्या आवाजात मन की बात बोलून दाखवलीच… पंकजा ताई मुख्यमंत्री झाल्याच पाहिजेत… अशी मोठ्या आवाजात कार्यकर्त्याने घोषणा दिली. ती घोषणा पंकजा मुंडे यांच्या कानावर पडली. क्षणभर पंकजा यांनाही काय बोलावं कळेना.. त्यांनी स्मितहास्य करत “शांत रहा.. शांत रहा.. असं करु नका.. ये लाल फेटेवाल्या.. गप बस रे…”, अशी सूचना करुन कार्यकर्त्याला आवरलं.

३ वर्षे भाजप नेतृत्वाला सवाल, पण आज…

कालपर्यंत मोदींना आव्हान देणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आज मात्र दसरा मेळाव्यात नरमाईची भूमिका घेतली. शत्रूलाही वाईट बोलणं आमच्या रक्तात नाही, आमच्या नेत्याला कसं आव्हान देईल. मी अजिबात नाराज नाही. नाराज कुणावर होऊ? माझी कुणाविषयी तक्रार नाही. मी हात जोडून विनंती करते, माझ्या नाराजीच्या चर्चा बंद करा. अशा चर्चा करु नका. आमच्या देशाचे नेते ज्या मुशीतून घडले, मी त्याच मुशीतून जन्माला आले. व्यक्ती श्रेष्ठ नाही संघटन श्रेष्ठ आहे, या विचाराची मी आहे. माझा विश्वास विचारांवर आहे. निवडणुकीत पराभव झालेल्या नेत्याला प्रतिनिधित्व नाही, हा पक्षाचा नियम मला मान्य आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करते आहे. महाराष्ट्रात फिरते आहे. आता सगळं विसरुन २०२४ च्या तयारीला लागा, असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

पंकजा मुंडे यांनी आजच्या भाषणातून आपल्या समर्थकांना संयम राखण्याचे जे आवाहन केले आहे, त्यामुळे त्यांच्या राजकीय दृष्ट्या नरमाईची भूमिका या विषयावर सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे.

In the Dussehra gathering at Bhagwan Bhaktigarh, Pankaja Munde told about the importance of non-personal organization.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात