म्हणे, अजितदादा वाचतात भाजपची स्क्रिप्ट; पण हा राऊतांचा आरोप की भाजप नेत्यांची प्रशस्ती??

संजय राऊत अजित पवार शरद पवार देवेंद्र फडणवीस

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत मधल्या चिंतन शिबिरात अजित पवारांचे दमदार भाषण मीडिया आणि सोशल मीडियामध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरले. अजितदादांनी आपले काका शरद पवारांचे पुरते वाभाडे काढले. शरद पवार भाजपच्या सत्तेमध्ये जायला कसे उतावळे होते??, याची तारीख वारा सकट तपशीलवार माहिती दिली.If ajit pawar reads BJP script, then it must be Accomplishment of BJP leaders!!

मात्र, अजितदादांच्या या भाषणावरच आक्षेप घेत संजय राऊत यांनी अजितदादा भाजपची स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोप केला. अशाच आशयाचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील केला. शरद पवारांचे राजकारण संपवण्याची अजितदादांनी सुपारी घेतली आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. अजितदादा भाजपची स्क्रिप्ट वाचतात. हा संजय राऊतांचा आरोप आणि पवारांचे राजकारण संपवण्याची अजितदादांनी सुपारी घेतली हा विजय वडेट्टीवार यांचा आरोप हे खरंच आरोप आहेत की भाजपची प्रशस्ती??, आणि ती राऊत आणि वडेट्टीवार स्वतःच्याच तोंडून का करतात??, असे सवाल तयार झाले आहेत.



कारण ज्या पद्धतीने अजित पवारांनी अत्यंत आक्रमक होऊन कर्जतच्या चिंतन शिबिरात शरद पवारांचे वाभाडे काढले, ती जर भाजपची स्क्रिप्ट असेल आणि ती अजित पवारांकडून भाजप वाचून घेत असेल, तर हे भाजप नेतृत्वाचे राजकीय कौशल्य मानले पाहिजे.

अजित पवार गेली 30-40 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाला आवडो अथवा न आवडो, पाय रोवून उभे आहेत. त्यांची बहुतांश वर्षे सत्तेवर गेली आहेत आणि काकांच्या छायेत राहूनही स्वतंत्र कर्तृत्व दाखविण्याची क्षमता मिळवलेला पुतण्या ही अजित पवारांची प्रतिमा आहे. ती कोणी मान्य करो अथवा न करो हे घडले आहे हे मात्र निश्चित!! त्यातही सतत सत्तेवर राहायचे किंवा सत्तेच्या वळचणीला राहायचे, हा संस्कार तर अजित पवारांनी यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्याकडूनच स्वीकारला आहे.

तुम्हाला कोणतीही ब्रेकिंग न्यूज न देता महायुतीत जागावाटप करू; अजितदादांचा मराठी माध्यमांना टोला!!

मग त्यांच्यासारखा महाराष्ट्राच्या राजकारणात मुरलेला मुरब्बी नेता जर भाजपची स्क्रिप्ट वाचत असेल किंवा त्याला ती वाचावी लागत असेल, तर हे कर्तृत्व कोणाचे?? आणि ते त्याने कशाच्या बळावर कमावले??, याचा विचार नको का करायला?? आणि हे “कर्तृत्व” भाजपच्या नेत्यांचे आहे, असे स्वतःच्या तोंडून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार बोलत असतील, तर ते भाजप वर आरोप करताहेत की भाजपच्या नेतृत्वाची प्रशस्ती करत आहेत??, इस सवाल त्यांना तरी बोचायला नकोत का??, अर्थात हे राऊत आणि वडेट्टीवार यांना स्वतःला समजत नसेल, तर निदान त्यांच्या राजकीय बॉसला देखील समजत नाही का??, त्याची हे कळीचे सवाल आहेत.

2014 च्या पूर्वी चौथ्या क्रमांकावर असलेला भाजप 2014 नंतर सतत पहिल्या नंबर वर येतो. ती आघाडी टिकवून ठेवतो आणि आपली स्क्रिप्ट अजित पवारांसारख्या मुरब्बी नेत्याच्या हातात देऊन वाचायला लावतो, हे भाजप नेत्यांचे कर्तृत्व साधे सोपे नाही. ते वाखाण्याजोगेच असल्याचे मान्य करावे लागेल!!

बरं भाजपची स्क्रिप्ट वाचण्याचा फक्त अजित पवारांवरच आरोप होतो असे नाही, तर तो एकनाथ शिंदे यांच्यावरही होतो. एकनाथ शिंदे हेही जर भाजपची स्क्रिप्ट वाचत असतील, तर एकाच वेळी शिंदे – पवारांसारख्या नेत्यांना अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनवून आपली स्क्रिप्ट त्यांच्याकडून वाचवून घेण्याची हिंमत जर भाजप नेते दाखवत असतील आणि त्यात ते यशस्वी होत असतील, तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले खरे “चाणक्य” कोण??, भाजपचे नेते की “माध्यमवीर चाणक्य” शरद पवार??, हा प्रश्न पडून त्याचे उत्तर मिळायला नको का??

If ajit pawar reads BJP script, then it must be Accomplishment of BJP leaders!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात