कंगना रनोत चंदीगडमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा; अभिनेत्रीने स्वत: दिले हे स्पष्टीकरण

Talks that Kangana Ranot will contest elections from Chandigarh

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या नावाची चर्चा आहे. या निवडणुकीसाठी ती भाजपची पुढील उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. चंदीगडमधून कंगना उमेदवारी करणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. मात्र, अभिनेत्री कंगना रानौतने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. Talks that Kangana Ranot will contest elections from Chandigarh

याआधी हिमाचलच्या मंडी आणि उत्तर प्रदेशच्या मथुरेतही कंगनाच्या नावाची चर्चा झाली होती. कंगना मूळची मंडीची रहिवासी असल्याने तिच्या नावाची चर्चा झाली होती, तर मथुरेला अधिक वेळा येणं जाणं असल्याने तिथूनही कंगना उमेदवारी करणार, अशी चर्चा होती. सध्या ​​​​​चंदीगड आणि मथुरा या दोन्ही ठिकाणी बॉलीवूड स्टारचं भाजपचे खासदार आहेत.

मात्र, या प्रकरणी चंदीगडचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र पाल मल्होत्रा ​​म्हणतात की, आमच्याकडे अशी कोणतीही माहिती नाही. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून ज्याला तिकीट दिले जाईल, त्याच्यासोबत संपूर्ण पक्ष निवडणूक लढवणार आहे.

कंगना रनौत ही भाजप समर्थक मानली जाते

कंगना रनौत ही भाजपची कट्टर समर्थक मानली जाते. याआधी हिमाचल प्रदेशमधून निवडणूक लढवण्यासाठी कंगनाच्या नावाची चर्चा होती, मात्र आता चंदीगडमध्येही त्यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपविरोधात बोलणाऱ्यांना त्या नेहमीच उघडपणे उत्तर देतात. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना आणि त्यांच्यात तणावाचे वातावरण होते. तेव्हापासून कंगना भाजपच्या विरोधकांवर निशाणा साधत आहे.

चंदीगडची जागा सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची

चंदीगड लोकसभेची जागा सर्वच पक्षांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण चंदीगड ही हरियाणा आणि पंजाब या दोन्ही राज्यांची राजधानी आहे. त्यासोबतच जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्येही चंदीगडचा प्रभाव आहे. त्यामुळे चंदीगड लोकसभेच्या जागेवर प्रत्येक पक्षाची नजर आहे.

Talks that Kangana Ranot will contest elections from Chandigarh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात