मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्हाला प्रामाणिक राहावेच लागेल; मुश्रीफांच्या तोंडून बाहेर आली राष्ट्रवादीची “मजबुरी”!!


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अजित गटाचे अध्यक्ष अजित पवारांचे कर्जत मधले राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरातले भाषण मीडिया आणि सोशल मीडियात प्रचंड गाजत आहे. अजित पवारांनी त्या भाषणात शरद पवारांचे पुन्हा एकदा पुरते वाभाडे काढले. त्यावर आज सायंकाळी 4.00 वाजता पत्रकार परिषद घेऊन शरद पवार प्रत्युत्तर देणार आहेत. Hasan Mushriff spoke of NCP’s political compulsion to inevitably with the BJP!!

पण त्याआधी अजित पवारांच्या भाषणावर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्यामध्ये अजित पवारांबरोबर भाजपच्या सत्तेत सामील झालेले मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया वैशिष्ट्यपूर्ण आहे. अजितदादा जे बोलले, ते खरंच आहे. अनिल देशमुख आमच्याबरोबर होतेच, पण त्यांना मंत्री व्हायचे होते आणि भाजपने त्यांना मंत्री केले नाही, म्हणून ते आज आमच्या बरोबर नाहीत, यावर हसन मुश्रीफांनी शिक्कामोर्तब केले.

बारामती, शिरूर, सातारा यांच्यासह अन्य काही मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा अजित पवारांनी त्या शिबिरात केली. मात्र, बारामतीत अजित पवार खरंच लढणार की लढल्यासारखे दाखवणार??, असा संशय व्यक्त करणारा सवाल शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केला.

जयंत पाटलांच्या या सवालावर प्रत्युत्तर देताना मुश्रीफांनी वेगळीच भाषा वापरली. ज्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत, त्या जागा आम्हाला लढवाव्याच लागतील बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच खासदार आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघात देखील आमचा उमेदवार लढलेच. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्हाला प्रामाणिक राहावेच लागेल. प्रामाणिकपणे काम करावेच लागेल, असे उद्गार हसन मुश्रीफ यांनी काढले!!

… आणि या उद्गारांमध्येच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मजबुरीचे राजकीय वैशिष्ट्य दडले आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांच्यासारख्या नेत्यांना भाजपचा राजकीय आश्रय घेण्याखेरीज पर्याय नाही, हेच यातून दिसून येते!! या तीन नेत्यांविरुद्धच्या वेगवेगळ्या केसेस कायदेशीर दृष्ट्या एवढ्या तगड्या आहेत, की त्यांना त्यातून सुटण्यासाठी दुसरा राजकीय पर्यायच उपलब्ध नाही.

शरद पवारांवर अवलंबून राहणे कठीण

शरद पवारांवर अवलंबून राहून त्यांची पुढची राजकारणातली 10 – 15 वर्षे निभणे कठीण आहे. अजितदादांनी कर्जतच्या शिबिरात हे वाक्य बोलूनच दाखविले होते. आपली आणि आपल्या अनुयायांची, विशेषतः तरुण कार्यकर्त्यांची पुढची 10 – 12 वर्षे महत्त्वाची आहेत. ती सुरळीतपणे मार्गी लावायची असतील, तर आपल्याला भाजप शिवाय दुसरा पर्याय नाही, हेच अजितदादांनी बोलून दाखविले. वेगळ्या शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची हीच “राजकीय मजबुरी” हसन मुश्रीफांनीही बोलून दाखविली. त्यातूनच त्यांचे, “आम्हाला प्रामाणिक राहावेच लागेल”, हे उद्गार बाहेर पडले. ही 2 डिसेंबर 2023 ची राजकीय वस्तुस्थिती आहे.

Hasan Mushriff spoke of NCP’s political compulsion to inevitably with the BJP!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात