बारामती विद्या प्रतिष्ठानच्या टेक्नॉलॉजी सेंटरसाठी गौतम अदानींची 25 कोटींची देणगी; पवारांनी मानले आभार!!


विशेष प्रतिनिधी

बारामती : बारामती विद्या प्रतिष्ठानच्या रोबोटिक्स स्टेशन प्रख्यात उद्योगपती गौतम अदानीं यांनी 25 कोटी रुपयांची देणगी दिली. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे आभार मानले.Gautam Adani’s donation of 25 crores for the Technology Center of Baramati Vidya Pratishthan; Thank you Pawar!!



विद्या प्रतिष्ठानच्या इंजीनियरिंग विभागामध्ये रोबोटिक सेंटरचे शरद पवार आणि फिनोलेक्स कंपनीचे उद्योगपती दीपक छाब्रिया यांच्या हस्ते झाले. याचा मुख्य कार्यक्रम बारामतीतील ग. दि. माडगूळकर सभागृहात झाला. त्यावेळी स्वतः पवारांनीच गौतम अदानी यांनी दिलेल्या देणगीचा उल्लेख करून त्यांचे आभार मानले.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी गेल्या दीड वर्षांपासून गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्याने टार्गेट केले आहे. मात्र त्याचवेळी शरद पवारांनी वेळोवेळी गौतम अदानींची पाठराखण केली आहे. आज सुद्धा बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात पवारांनी उघडपणे गौतम अदानी यांनी दिलेल्या देणगीचा उल्लेख करून त्यांचे आभार मानल्याने काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Gautam Adani’s donation of 25 crores for the Technology Center of Baramati Vidya Pratishthan; Thank you Pawar!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात