जरांगेंच्या जन्माच्या आधीपासून लढतोय, त्यांच्या कोल्हेकुईला नाही घाबरत; छगन भुजबळांचा पलटवार

Counterattack by Chhagan Bhujbal

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या जन्माच्या आधीपासून मी लढतोय. त्यामुळे त्यांच्या कुठल्या कोल्हेकुईला मी घाबरत नाही, अशा परखड शब्दांमध्ये शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी पलटवार केला.Fighting since before the birth of Jaranges, not afraid of their Kolhekui; Counterattack by Chhagan Bhujbal

मनोज जरांगे पाटलांनी आज बीडमध्ये सभा घेऊन 20 जानेवारीपासून मुंबईतल्या आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्याची घोषणा केली. त्यांनी नेहमीप्रमाणे छगन भुजबळांवर अरे तुरेच्याच भाषेत टीका केली. जरांगेंच्या भाषणाला भुजबळांनी प्रत्युत्तर दिले.



छगन भुजबळ म्हणाले :

मनोज जरांगेंचे भाषण म्हणजे केवळ माझ्यावर टीका होती. बीडची जाळपोळ तुमच्या लोकांनीच केली. 20 जानेवारीपर्यंत ते शांत बसणार आहेत. तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये राहतील. त्यांनी तब्येतीला संभाळावे. आरे म्हटलं तर कोणीतरी कारे म्हणणार आहे. कोणाला दुखावण्याची मला हौस नाही. मला माझी जबाबदारी समजते.

पण एकाच भाषणात विरोधाभास होणार नाही, याची काळजी जरांगेंनी घ्यावी. जरांगेंच्या मोठ्या दाव्यावर विश्वास ठेवू नका. देशामध्ये जातगणना करा. त्यानंतर कोणत्या जातीची संख्या जास्त आहे हे समजेलच.

काय म्हणाले होते जरांगे?

सरकार भुजबळांचे ऐकतंय, ते सोबत बाजाराची पिशवी घेऊन हिंडतात. त्यात कागद, मग कशाला बोंबलतो रे मग??, अशा भाषेत जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला होता. तुला म्हटलं होतं नको नादी लागू. मी बेकार आहे, आता कसा बारीक आवाज बोलतो. जरांगे साहेब म्हणतो असे जरांगे म्हणाले.

मी म्हणलं डंगराला कशाला बोलायचं,पण हे येडपट बोलते, मग आपण सोडत नसतो, जर कुणी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तर त्याला सुट्टी नाही, अशा भाषेत त्यांनी भुजबळांवर टीका केली होती.

भुजबळांनीही मनोज जरांगे पाटलांच्या या भाषेला, मी जरांगेंच्या जन्माच्या आधीपासून लढतोय. त्यांच्या कोल्हेकुईला मी घाबरत नाही, अशा परखड शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले.

Fighting since before the birth of Jarange, not afraid of their Kolhekui; Counterattack by Chhagan Bhujbal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात