भुजबळांनंतर फडणवीसांना उचकणारा मनोज जरांगेंचा वार; पण जरांगेंच्या मुस्लिम आरक्षणाच्या भाषेवरून नितेश राणेंचा तिखट प्रहार!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण ही लढाई मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ अशा वैयक्तिक लढाईत परिवर्तित झाल्यानंतर त्यातून आपले नुकसान होण्याची शक्यता लक्षात येताच मनोज जरांगे पाटलांनी आपल्यातील टीकेच्या तोफा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे वळविल्या. पण त्यांना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तितकेच तिखट प्रत्युत्तर देऊन छगन भुजबळ यानंतर फडणवीसांना उचकवण्याचा मनोज जरांगे पाटलांचा डाव उलटवून टाकला आहे.Manoj Jarang’s blow to Fadnavis after Bhujbals; But Nitesh Rane’s harsh attack on Jarang’s Muslim reservation language!!मनोज जरांगे पाटील कालपर्यंत छगन भुजबळ यांना टार्गेट करत होते, तसेच जालन्याच्या सभेत आज त्यांनी भुजबळ यांना टार्गेट केले. पण त्याबरोबरच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील प्रहार केले. देवेंद्र फडणवीस यांच्या ताटात जेवणारे मराठ्यांच्या विरोधात बोलताहेत. माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या डोक्यातला विषारी विचार मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नये. त्यांच्या माध्यमातून समाजात कलह पसरवू नये. अन्यथा तुमचा सामना आमच्याशी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आधी मोठेपणा दाखविला होता. त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास बसायला लागला होता, पण आता त्यांनी पुन्हा खोड्या सुरू केल्याचे दिसते. भाजपमधले फडणवीस यांच्या जवळचेच नेते मराठा समाजाच्या विरोधात बोलताहेत. फडणवीस यांच्या ताटात जेवणारेच मराठा समाजाच्या विरोधात गेलेत. फडणवीसांनी त्यांना समज द्यावी अन्यथा आम्ही त्यांना बघून घेऊ, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटलांनी आज फडणवीस यांच्या शरसंधान साधले.

मनोज जरांगे पाटलांना भाजप आमदार नितेश राणे यांनी तितकेच तिखट प्रत्युत्तर दिले. नितेश राणे म्हणाले, मनोज जरांगे पाटलांना आम्ही पहिल्याच दिवशी स्पष्ट केले होते की, तुम्ही मराठा आरक्षणावर बोलाल, तर आम्ही त्याचे स्वागतच करू. पण देवेंद्र फडणवीसांवर केलेली टीका आम्ही सहन करणार नाही. ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले होते, मराठा समाजाला विविध सोयी सवलती आणि योजना दिल्या. त्यांच्या विरोधात तुम्ही भूमिका घ्याल आणि बोलाल तर आम्ही ते सहन करणार नाही. तुम्ही फडणवीस यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली तर गाठ या मराठ्यांची आहे, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

जरांगेंच्या तोंडी मुस्लीम आरक्षणाची भाषा

त्या पलीकडे जाऊन नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटलांची बदललेली स्ट्रॅटेजी एक्सपोज केली. नितेश राणे म्हणाले, मनोज जरांगे पाटलांनी फडणवीस यांच्यावर केली टीका आम्ही सहन करणार नाही. मग तुमच्या डोक्यात खरं विष कोण टाकतंय?? तुम्हाला भाषण कोण लिहून देतंय?? तुमच्या तोंडी मुस्लिम आरक्षणाची भाषा कोण बोलून घेतंय?? याची पुराव्यासह यादी आम्हाला बाहेर काढावी लागेल, असा स्पष्ट इशारा नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटलांना दिला.

Manoj Jarang’s blow to Fadnavis after Bhujbals; But Nitesh Rane’s harsh attack on Jarang’s Muslim reservation language!!

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*