विशेष प्रतिनिधी
पुणे : शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या परिवाराने विकसित केलेल्या बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्ती आणि ड्रग्स तस्करी वाढल्या असल्याचे दिसून येत असून पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामती मध्ये धडक कारवाई करून गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.Ganja smuggling in Pawar’s Baramati; 634 kg of ganja worth Rs 3 crore seized; 7 smugglers arrested!!
या संदर्भात कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलवर ट्विट करून खुलासा केला.
– रोहित पवारांचे ट्विट असे :
बारामतीतील गुन्हेगारी आणि ड्रग्जसंदर्भात नुकतीच पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल साहेब यांची भेट घेऊन यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामतीत गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करत ६३४ किलो गांजासह ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यात ७ जणांना अटक केली आहे.
– मोठे रॅकेट असण्याची शक्यता
पोलिसांची ही कारवाई निश्चितच स्वागतार्ह आहे. पण बारामतीत वाढत असलेल्या या दोन नंबरच्या धंद्याचा पोलिसांनी अधिक सखोल तपास केला, तर आणखी खूप मोठं रॅकेट उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही. शिवाय वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यापाराप्रमाणेच डोकं वर काढत असलेली गुन्हेगारीही पोलिसांनी मोडीत काढावी, ही विनंती!
बारामतीतील गुन्हेगारी आणि ड्रग्जसंदर्भात नुकतीच पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल साहेब यांची भेट घेऊन यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामतीत गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करत ६३४ किलो गांजासह ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल… pic.twitter.com/CV16qFlEjo — Rohit Pawar (@RRPSpeaks) May 22, 2026
बारामतीतील गुन्हेगारी आणि ड्रग्जसंदर्भात नुकतीच पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल साहेब यांची भेट घेऊन यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामतीत गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करत ६३४ किलो गांजासह ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल… pic.twitter.com/CV16qFlEjo
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 22, 2026
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App