Gadchiroli : गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का; वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात ‘ऑपरेशन लोटस’; धानोरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Gadchiroli

विशेष प्रतिनिधी

धानोरा : Gadchiroli  गडचिरोलीच्या राजकारणात अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोडी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गडचिरोलीतील राजकीय बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावला आहे. धानोरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्षांसह तब्बल ९ नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नागपुरात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा दिमाखात पार पडला.Gadchiroli

धानोरा नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी तब्बल १३ जागा जिंकत काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली एकहाती वर्चस्व सिद्ध केले होते. मात्र, एकाच वेळी ९ नगरसेवक फुटल्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या स्थानिक नेतृत्वाला आणि काँग्रेस पक्षाला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.Gadchiroli



९ नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसकडे आता केवळ ४ नगरसेवक उरले आहेत. त्यामुळे धानोरा नगरपंचायतीवरील काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली असून भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रमुख पदाधिकारी व नगरसेवक

उपनगराध्यक्ष ललित बरछा यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा पौर्णिमा सयाम यांच्यासह ललित बरछा, भूषण उंदीरवाडे, माणिक मडावी, कालिदास मोहुर्ले, नरेश चिमूरकर, सुषमा भुरसे, सीमा काटेंगे, ,यामिना पेंदाम या नगरसेवकांनी भाजपचा झेंडा हातात घेतला.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

या पक्षप्रवेशाबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “भारतीय जनता पक्षाच्या विचारांवर विश्वास व्यक्त करत पक्षात सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. तसेच त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या सहभागामुळे पक्ष संघटना अधिक बळकट होईल आणि जनतेच्या विकासासाठी नव्या जोमाने कार्य करण्यास निश्चितच बळ मिळेल,” असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

भाजपची ताकद वाढली

दरम्यान, या मोठ्या राजकीय फेरबदलामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. एकेकाळी काँग्रेसचा भक्कम गड मानल्या जाणाऱ्या धानोरा नगरपंचायतीवर आता भाजपने ताबा मिळवल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर काँग्रेसच्या गोटात चिंतेचे सावट पसरले आहे.

Congress Blow in Gadchiroli: Dhanora Nagar Panchayat President, 9 Corporators Join BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात