Farmer : शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अनुदान वितरण सुरू; पहिल्या टप्प्यात 2399 कोटींचे वाटप!!

Farmer cotton soyabin grant start

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३ च्या खरीप हंगामासाठीचे अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. Farmer cotton soyabin grant start

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर असे दोन हेक्टर च्या मर्यादेत प्रत्येकी ५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे. Farmer

पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात येत आहेत. राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे ९६ लाख ७८७ इतकी आहे.

त्यापैकी ६८ लाख ६ हजार ९२३ खात्यांची माहिती पोर्टलवर भरली गेली आहे. Farmer


Bhagyshri Atram : पवारांच्या घरफोडीला काँग्रेसचाच खोडा; वडेट्टीवार म्हणाले, भाग्यश्री अत्राम करतील धर्मरावबाबांचा विजय सोपा!!


यात नमो शेतकरी Farmer महासन्मानच्या माहिती सोबत आधार जुळणी व ७० टक्के पर्यंत नावाची पडताळणी झालेली संख्या ४१ लाख ५० हजार ६९६ इतकी आहे. तर आधार जुळणी व ६९ टक्क्यांहून माहितीची पडताळणी झालेल्यांची संख्या ४ लाख ६०हजार ७३० इतकी आहे.

याव्यतिरिक्त आधारसंमतीपत्रानुसार माहिती भरलेल्या खात्यांची संख्या १७ लाख ५३ हजार १३० इतकी आहे. Farmer

अशा रीतीने ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या ६३ लाख ६४ हजार खात्यांवर अनुदानचे अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे. त्यासाठी २ हजार ३९८ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद लागणार आहे.

Farmer cotton soyabin grant start

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात