विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स महायुतीला भारी ठरल्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मतदारांची सहानुभूती मिळाल्याचा निष्कर्ष मराठी माध्यमांनी काढला. पण प्रत्यक्षात महाविकास आघाडीतल्या काँग्रेसचा परफॉर्मन्स पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यापेक्षा अव्वल ठरल्यानंतर राजकारणाचा कल ओळखून अचूक हालचाली करणाऱ्या इच्छुकांचा कल मात्र काँग्रेसकडेच वळला.
तसे चित्र काँग्रेसकडे आलेल्या इच्छुकांच्या अर्जांच्या आकड्यावरून सिद्ध झाले. काँग्रेसकडे महाराष्ट्र विधानसभेच्या 100 जागांवर तब्बल 1688 इच्छुकांनी अर्ज केले. त्या तुलनेत पवारांच्या राष्ट्रवादीकडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे फारच कमी इच्छुकांचा कल दिसून आला.
Bhagyshri Atram : पवारांच्या घरफोडीला काँग्रेसचाच खोडा; वडेट्टीवार म्हणाले, भाग्यश्री अत्राम करतील धर्मरावबाबांचा विजय सोपा!!
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 पैकी 14 जागा जिंकून डबल डिजिट गाठणारी काँग्रेस हा एकमेव राजकीय पक्ष ठरला. भाजप, ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष डबल डिजिटवरून सिंगल डिजिटवर घसरले. पवारांच्या राष्ट्रवादीने डबल डिजिट संख्या गाठायचा प्रश्नच नव्हता कारण त्या पक्षाने त्यांच्या राजकीय हयातीत लोकसभेत डबल डिजिट संख्या गाठलेली नव्हती.
या पार्श्वभूमीवर मराठी माध्यमांनी जरी ठाकरे पवारांच्या पक्षांना सहानुभूती मिळाल्याचे चित्र निर्माण केले असले तरी प्रत्यक्षात काँग्रेसच्या परफॉर्मन्सच्या आधारे त्या पक्षाच्याकडेच विधानसभेचा इच्छुकांचा कल वाढला, हे आकडेवारीनिशी सिद्ध झाले. आता पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, यशोमती ठाकूर, चंद्रकांत हंडोरे, विश्वजित कदम आदी नेत्यांची समिती महाराष्ट्रात दौरा काढून इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. त्याचा गुप्त अहवाल 10 ऑक्टोबर पर्यंत पक्षश्रेष्ठींना पाठवणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more