सर्व कार्यकर्त्यांना बैठकी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावेळी दापोलीचे उपाध्यक्ष केदार साठेसुद्धा या बैठकीला निमंत्रित होते Fadnavis supplied Dapoli vice president’s daughter’s hut; Interact with video calls
विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : गुरुवारी कोकण विभागातील विविध जिल्ह्यांच्या भाजपच्या आढावा बैठकी होत्या.यावेळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस स्वत: या बैठकीचा आढावा घेणार होते. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावेळी दापोलीचे उपाध्यक्ष केदार साठेसुद्धा या बैठकीला निमंत्रित होते.
दरम्यान बैठकी दिवशीच म्हणजे गुरुवारी केदार साठे यांची मुलगी प्रचिती हिचा वाढदिवस होता. वाढदवसानिमित्त प्रचीतीची इच्छा होती की ,आपल्या वाढदिवशी बाबांनी कुठेही जाऊ नये. पक्षाची बैठक महत्त्वाची होती.
त्यामुळे साठे यांना बैठकीत उपस्थित राहणे महत्त्वाचे होते.त्यामुळे साठे यांनी मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, प्रचिती वेगळाच हट्ट धरुन बसली. ‘जर, देवेंद्र फडणवीस काका मला शुभेच्छा देणार असतील, तरच मी तुम्हाला परवानगी देईन’, असं तिने साठेंना सांगितलं.
तुम्ही जर देवेंद्र फडणवीस काकांकडून मला ‘हॅप्पी बर्थडे’चा फोन करणार असाल तरच बैठकीला जा, नाहीतर जाऊ नका! नेता आणि परिवार असावा तर असा!झाले असे की, आज कोकण विभागातील विविध जिल्ह्यांच्या भाजपाच्या आढावा बैठकी होत्या. दापोलीचे उपाध्यक्ष केदार साठे सुद्धा या बैठकीला निमंत्रित होते. pic.twitter.com/braELAAq4l — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 2, 2021
तुम्ही जर देवेंद्र फडणवीस काकांकडून मला ‘हॅप्पी बर्थडे’चा फोन करणार असाल तरच बैठकीला जा, नाहीतर जाऊ नका!
नेता आणि परिवार असावा तर असा!झाले असे की, आज कोकण विभागातील विविध जिल्ह्यांच्या भाजपाच्या आढावा बैठकी होत्या. दापोलीचे उपाध्यक्ष केदार साठे सुद्धा या बैठकीला निमंत्रित होते. pic.twitter.com/braELAAq4l
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 2, 2021
मग साठे बैठकीला उपस्थित राहिले.दरम्यान बैठक संपल्यानंतर केदार साठे यांनी हा किस्सा देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकला. फडणवीसांनीही दापोली उपाध्यक्षांच्या मुलीचा हट्ट पुरवण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर केदार साठे यांनी प्रचितीला व्हिडीओ कॉल लावला आणि फडणवीसांनी तिच्याशी संवाद साधला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App