मुंबईकर नागरिकांसाठी फडणवीस सरकारचे मोठे गिफ्ट; २९५ एकर जागेवर उभारणार जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क!!

Fadnavis government

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईकर नागरिकांसाठी सर्वांत मोठे गिफ्ट ठरणाऱ्या, महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या सेंट्रल पार्क प्रकल्पाचा विकास आराखडा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आला.Fadnavis government’s big gift for Mumbaikars; World-class Central Park to be built on 295 acres of land!!

हे सेंट्रल पार्क भूमिगत मार्गाने थेट कोस्टल रोडशी आणि मेट्रो मार्गांशी जोडले जाणार आहे. त्यामुळे रेसकोर्सच्या ऐतिहासिक वारशाला कुठेही धक्का लागणार नाही, असे शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले.

– १० लाख स्क्वेअर फुटांचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स

२९५ एकर जमिनीवरील या भव्यदिव्य सेंट्रल पार्कखाली १० लाख चौरस फुटांचे जागतिक दर्जाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सही विकसित केले जाणार आहे. यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळांसह खेळ, खो-खो, कबड्डी, अशा मराठमोळ्या खेळांसाठीही सुविधा उपलब्ध होतील. या प्रकल्पामुळे ३०० एकरचे ऑक्सिजन पार्क तयार होणार असल्यानं मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आटेंडर



– ५५० कोटींचे टेंडर

वाहतूक नियोजनच्या दृष्टीने हे सेंट्रल पार्क १२०० मीटर भूमिगत मार्गाने कोस्टल रोडशी जोडले जाणार आहे. यासाठी ५५० कोटींचे टेंडर काढण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांचे डिझाईन हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी केले असल्याचे याप्रसंगी नमूद केले.

यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.

Fadnavis government’s big gift for Mumbaikars; World-class Central Park to be built on 295 acres of land!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात