केंद्राचा मोठा निर्णय, ब्रिटनला पाठवले जाणारे कोव्हिशील्ड लसीचे 50 लाख डोस भारतातच वापरणार, राज्यांना मिळणार दिलासा

Centers big decision, 50 lakh doses of covishield vaccine to be sent to UK Now will be used in India alone

Covishield Vaccine : देशातील कोरोना लसीची वाढती मागणी आणि उपलब्धता लक्षात घेता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ब्रिटनला पाठवण्यात येणारे कोव्हिशील्डचे 50 लाख डोस आता भारतातच वापरण्यात येणार आहेत. केंद्र सरकार हे डोस देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देणार आहे. Centers big decision, 50 lakh doses of covishield vaccine to be sent to UK Now will be used in India alone


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील कोरोना लसीची वाढती मागणी आणि उपलब्धता लक्षात घेता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ब्रिटनला पाठवण्यात येणारे कोव्हिशील्डचे 50 लाख डोस आता भारतातच वापरण्यात येणार आहेत. केंद्र सरकार हे डोस देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देणार आहे.

तथापि, यापूर्वी ही लस सीरम संस्थेद्वारे ब्रिटनला पाठवण्यात येत होती. लसीच्या या डोसद्वारे 18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. 23 मार्च रोजी सीरम संस्थेने आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून कोव्हिशील्डचे 50 दशलक्ष डोस ब्रिटनला पुरविण्यास मान्यता मागितली होती.

सीरम संस्थेने या संदर्भात अ‍ॅस्ट्राझेनेकाबरोबर झालेल्या कराराचा हवाला दिला आणि भारताला आश्वासन दिले की, या पुरवठ्यामुळे त्यांच्या लसीकरण कार्यक्रमावर परिणाम होणार नाही. त्यानंतर मंत्रालयाने राज्यांना कंपनीशी संपर्क साधून लस खरेदी त्वरित करण्यास सांगितले.

काही राज्यांमध्ये साडेतीन लाख डोसचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर काही राज्यांना प्रत्येकी एक लाख, तर काही राज्यांना 50 हजार डोस मिळाले आहेत. या लसींवर कोविशील्डऐवजी कोविड-19 अॅस्ट्राझेनेकाचे लेबल लावण्यात आलेले आहे. काही दिवसांपासून भारतात दररोज चार लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत, मृतांच्या संख्येनेही उच्चांक गाठला आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाला वेग आल्यास महामारी रोखण्यास मोठी मदत होणार आहे.

Centers big decision, 50 lakh doses of covishield vaccine to be sent to UK Now will be used in India alone

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात