Congress Leader Sandeep Dixit Blames Kejriwal government on Corona outbreak, says- Delhi Govt should be charged with murder

काँग्रेसच्या संदीप दीक्षितांनी काढले केजरीवाल सरकारचे वाभाडे, म्हणाले- त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल व्हावा! वाचा सविस्तर…

Congress Leader Sandeep Dixit : अवघ्या देशाप्रमाणेच दिल्लीतही कोरोना संसर्गाचा भयंकर प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकार महामारीच्या काळात कायम केंद्राकडे बोट दाखवत आलंय. परंतु काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे सुपुत्र संदीप दीक्षित यांनी केजरीवाल सरकारच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. असंख्या दिल्लीकरांच्या मृत्यूसाठी केजरीवाल सरकारचा नाकर्तेपणाच कारणीभूत असल्याचे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. Congress Leader Sandeep Dixit Blames Kejriwal government on Corona outbreak, says- Delhi Govt should be charged with murder


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अवघ्या देशाप्रमाणेच दिल्लीतही कोरोना संसर्गाचा भयंकर प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकार महामारीच्या काळात कायम केंद्राकडे बोट दाखवत आलंय. परंतु काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे सुपुत्र संदीप दीक्षित यांनी केजरीवाल सरकारच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. असंख्या दिल्लीकरांच्या मृत्यूसाठी केजरीवाल सरकारचा नाकर्तेपणाच कारणीभूत असल्याचे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे.

एक व्हिडिओ जारी करून संदीप दीक्षित यांनी केजरीवाल सरकारचे वाभाडे काढले आहेत. ते म्हणाले की, दिल्लीकरांना काही गोष्टी मोफत हव्या होत्या, म्हणून तुम्हाला निवडून दिलंय. जनतेच्या प्राथमिकता बदलत असतात हे मान्य. पण केजरीवाल सरकारने मोफत पाणी, वीज याव्यतिरिक्त केलं तरी काय? शीला दीक्षित यांच्या सरकारने दिल्लीतील रुग्णालयातील बेडची संख्या चार हजारांवरून 11 हजारांपर्यंत नेली. आता केजरींनी त्यात काडीचीही भर घातलेली नाही. अरविंद केजरीवाल सर्व बाबींसाठी केंद्राला दोष देतात, पण ते स्वत: मात्र काहीच करत नाहीत. केजरीवाल सरकारने स्वत:हून एकही ऑक्सिजन प्लांट उभारला नाही. त्यांना हे सहज शक्य होते. कारण दररोज त्यांच्या फोटोसकट छापून येणाऱ्या जाहिराती पाहिल्या तरी त्यांचा दिवसाला खर्च 10 ते 15 कोटी आहे. लोकांना तुमचे फोटो पाहण्याची मुळीच गरज नाही, तुम्ही का उभारू शकले नाहीत, एखादा ऑक्सिजन प्लांट!

शीला दीक्षित सरकारने 10 ते 15 नव्या रुग्णालयांची पायाभरणी केली होती, पण केजरीवालांनी ते सर्व प्रकल्प बासनात गुंडाळले, असा आरोपही त्यांनी केला. केजरीवालांना फक्त केंद्रावर आरोप करता येतात, त्यांना एलजीपेक्ष जास्त अधिकार पाहिजेत. दिल्लीकरांना स्वत: गोष्टींची आश्वासने देता येतात, पण केजरीवालांनी हे करून दिल्लीकरांचे आयुष्यच स्वस्त करून टाकले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Congress Leader Sandeep Dixit Blames Kejriwal government on Corona outbreak, says- Delhi Govt should be charged with murder

महत्त्वाच्या बातम्या