विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती ही अत्यंत बिकट असल्याचं पाहायला मिळत आहे. याच स्थितीचा नेमका आढावा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन घेतला आहे . यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेेंसोबत राज्यातील कोरोना स्थितीविषयी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली.महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढाई चांगली लढत आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच कौतुक देेखील केलं आहे.when PM Calls CM of Maharashtra! Uddhav Thakrey says thank you Modiji
कोरोनाविरूद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान श्री. @narendramodi यांनी आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली. दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असे ते म्हणाले. — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 8, 2021
कोरोनाविरूद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान श्री. @narendramodi यांनी आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली. दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असे ते म्हणाले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 8, 2021
यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले.
PM Narendra Modi spoke to Maharashtra CM Uddhav Thackeray on the COVID-19 related situation in the state pic.twitter.com/MvcOvUcaq1 — ANI (@ANI) May 8, 2021
PM Narendra Modi spoke to Maharashtra CM Uddhav Thackeray on the COVID-19 related situation in the state pic.twitter.com/MvcOvUcaq1
— ANI (@ANI) May 8, 2021
पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App