पंजाब सरकारचा भोंगळ कारभार उघड, सरकारी साठ्यातील हजारो रेमडेसिव्हिर इंजेक्शन सापडले भाक्रा कालव्यात

Thousands of Remdesivir injections Of Government Supply were found in the Bhakra canal in Punjab

Remdesivir injections : कोरोना महामारीच्या या दुसऱ्या लाटेत अवघ्या देशात रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे ओरड सुरू आहे. पंजाबात मात्र हेच इंजेक्शन्स कालव्यात आढळले आहेत. सरकारी पुरवठ्याचे इंजेक्शन कालव्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोना संकटात जीवनरक्षक म्हणवल्या जाणाऱ्या या इंजेक्शनचा आधीच मोठा काळाबाजार सुरू आहे, त्यातच राज्यातील काँग्रेस सरकारच्या भोंगळ कारभारामुळे हे इंजेक्शन असे वाया जात असल्याची टीका सुरू आहे. Thousands of Remdesivir injections Of Government Supply were found in the Bhakra canal in Punjab


विशेष प्रतिनिधी

चंदिगड : कोरोना महामारीच्या या दुसऱ्या लाटेत अवघ्या देशात रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे ओरड सुरू आहे. पंजाबात मात्र हेच इंजेक्शन्स कालव्यात आढळले आहेत. सरकारी पुरवठ्याचे इंजेक्शन कालव्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोना संकटात जीवनरक्षक म्हणवल्या जाणाऱ्या या इंजेक्शनचा आधीच मोठा काळाबाजार सुरू आहे, त्यातच राज्यातील काँग्रेस सरकारच्या भोंगळ कारभारामुळे हे इंजेक्शन असे वाया जात असल्याची टीका सुरू आहे.

पंजाबमधील चामकौर साहिब जवळील भाक्रा कालव्यातून शेकडो रेमडेसिव्हिर आणि छातीतील संसर्गावरील इंजेक्शन्स ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामध्ये सरकारला पुरविण्यात येणारे 1456 इंजेक्शन्स, 621 रीडेडिझिव्हर इंजेक्शन्स आणि 849 लेबल न लावलेल्या इंजेक्शनचा समावेश आहे. तथापि, हे इंजेक्शन खरे आहेत की बनावट हे अद्याप स्पष्ट नाही.

स्थानिक माध्यमांच्या मते, रेमडेसिव्हिर इंजेक्शनवर एमआरपी 5400 रुपये आणि मॅन्युफॅक्चरिंगची तारीख मार्च 2021 आणि एक्स्पायरी डेट नोव्हेंबर 2021 लिहिलेली आहे. सेफोपेराझोन इंजेक्शनची उत्पादन तारीख एप्रिल 2021 आणि एक्स्पायरी डेट 2023 आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व सामग्रीवर फॉर गव्हर्नमेंट सप्लाय नॉट फॉर सेल असे लिहिलेले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की देशात रेमेडिसिव्हिर आणि चेस्ट इन्फेक्शनच्या इंजेक्शन्सचे मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटिंग सुरू आहे. पंजाबमध्ये रेमडेसिव्हिर आणि इतर औषधांचीही कमतरता आहे. अशा परिस्थितीत भाक्रा कालव्यात सरकारला पुरवठा करण्याचे इंजेक्शन आढळल्याने राज्यातील काँग्रेस सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

नुकतेच, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले होते की, केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या 809 व्हेंटिलेटर्सपैकी 108 स्थापित करण्यासाठी अडचणी येत आहेत, कारण यासाठी कोणीही बीईएल इंजिनिअर मिळालेला नाही. अवघे राज्य ऑक्सिजन, टँकर, लस आणि औषधांच्या तुटवड्याशी संघर्ष करत आहे. गेल्या महिन्यापासून त्यांनी केंद्राला अनेक वेळा पत्रेही लिहिली आहेत. त्याच वेळी राज्याला मिळालेली औषधी मात्र अशी कालव्यात वाहून दिली जात असल्याचा ठपका आता विरोधकांनी ठेवला आहे.

Thousands of Remdesivir injections Of Government Supply were found in the Bhakra canal in Punjab

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात