विशेष प्रतिनिधी
मुंबई – कोरोनाचे कारण देऊन मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा आरोप भाजपचे नेते आशिश शेलार यांनी करून काही तास उलटतात ना तोच शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नेमके तेच विधान केले आहे. BMC polls will be conducted next year in January-February if the COVID situation is under control
मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारी – फेब्रुवारी २०२२ मध्येच होईल. पण कोरोनाचा प्रकोप थांबला तरच निवडणूक नियोजित वेळेत होईल. अन्यथा ती पुढे ढकलावी लागेल, असे विधान किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आशिश शेलार यांनी केलेल्या आरोपाची पुष्टी करणारेच आहे.
आशिश शेलार म्हणाले होते, की कोरोनाचे कारण देऊन मुंबई महापालिकेची निवडणूक दोन वर्षांनी पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून निवडणूक आयोगाने ठरवले आणि निवडणूक वेळेतच घेतली तरी भाजप पूर्ण तयार आहे. सामनामध्ये दररोज डायलॉगबाजी केली जाते. आज आम्हीही शिवसेनेला त्यांच्याच भाषेत सांगतो, बंदूक भी तेरी, गोली भी तेरी, दिन-तारीख भी तेरी, दिन कहे दिन, शाम कहे शाम, शिवसेना को परास्त करने भाजप तयार है.
शेलार म्हणाले, जनगणनेचे कारण देऊन मुंबईतील वॉर्ड रचना बदलण्याचे कारस्थान सत्ताधारी शिवसेनेकडून रचले जात आहे. कोरोनाच्या नावाखाली अनेक गोष्टी सुरू आहेत. २०११ च्या जनगणेनुसार २०१७ ची प्रभागरचना झाली, मग आता त्याच जनगणनेनुसार २०२२ मध्ये प्रभागरचना का? जनगणना करता येणार नाही, नव्याने मतदार नोंदणी करताना जास्त वेळ लागेल, असा त्यामागचा डाव आहे. जितके करता येईल तितके निवडणूक पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
मात्र, महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा आरोप फेटाळून लावला. कोरोनाचा प्रकोप सगळ्यांना दिसतोय. अशा स्थितीत निवडणूक लोकांवर लादून तो आणखी वाढविण्याची गरज काय, असा सवाल पेडणेकर यांनी केला.
Vaccination works as per the Centre's guidelines. Our CM will speak to the respective departments and a solution will be brought in accordingly: Mumbai Mayor Kishori Pednekar when asked on BMC allowing vaccination for students going abroad, and increased gap for 2nd dose. — ANI (@ANI) June 1, 2021
Vaccination works as per the Centre's guidelines. Our CM will speak to the respective departments and a solution will be brought in accordingly: Mumbai Mayor Kishori Pednekar when asked on BMC allowing vaccination for students going abroad, and increased gap for 2nd dose.
— ANI (@ANI) June 1, 2021
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App