आता सबसे बडा खिलाडी अक्षयकुमारचे आयुर्वेद उपचारावर भर देण्याचे आवाहन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – परदेशातील लोक इथे येऊन उपचार करत आहेत आणि आपण त्यांच्या मागे पळत आहोत. मला ॲलोपथी आणि औषधाला आक्षेप नाही. ते आपल्याजागी सर्वोत्तम आहे. परंतु आपण उपचारासाठी आयुर्वेदासारखी आपली पारंपरिक पद्धती का विसरत आहोत असा सवाल फिटनेससाठी ओळखले जाणार अभिनेते अक्षयकुमार यांनी कला आहे. Akshay Kumar bats for ayrvedaसध्या बाबा रामदेव आणि ॲलोपथी डॉक्टर यांच्यात वाद सुरू आहे. यादरम्यान योगगुरुंनी अक्षयकुमारचे दोन व्हिडिओ शेअर करत ट्विट केले आहे. त्यात अक्षयकुमार यांचा संदर्भ देत म्हटले की, आपण आपल्या देहयष्टीचे स्वत:च ब्रँड अम्बेसिडर व्हा. साधे आणि आरोग्यदायी जीवन जगा आणि जगाला दाखवून द्या की, हिंदुस्थानी योगा आणि आयुर्वेदातील शक्ती ही अन्य कोणत्याही इंग्रजांच्या केमिकल इंजेक्शनमध्ये नाही. शरिराचा असा कोणताही आजार नाही की त्याच्यावर आयुर्वेदातून उपचार होत नाहीत.

अक्षयकुमार पुढे म्हणतात, की आपण अलिकडेच आयुर्वेदिक आश्रमात काही दिवस व्यतित केले. या आश्रमात ते एकमेव हिंदुस्तानी होते आणि उर्वरित परकी होते. परदेशातील नागरिक आपल्या देशात बरे होत असतील तर आपण का नाही?

Akshay Kumar bats for ayrveda

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण