मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची कटकारस्थाने, ३० वॉर्डमध्ये फोडाफोडी, आशिष शेलार यांचा आरोप


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची कटकारस्थाने सुरू आहेत. शिवसेनेकडून जे ३० वॉर्ड आपण कधीच जिंकू शकत नाही अशा वॉर्डला टार्गेट करुन तिथं फोडाफोडी करण्याचा डाव शिवसेनेनं आखला आहे, असा आरोप माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. Shiv Sena’s conspiracies for Mumbai Municipal Corporation, vandalism in 30 wards, allegations of Ashish Shelar


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची कटकारस्थाने सुरू आहेत. शिवसेनेकडून जे ३० वॉर्ड आपण कधीच जिंकू शकत नाही अशा वॉर्डला टार्गेट करुन तिथं फोडाफोडी करण्याचा डाव शिवसेनेनं आखला आहे, असा आरोप माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

पत्रकारांशी बोलताना शेलार म्हणाले, मुंबई भाजप सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. आपली पराभव लक्षात घेता शिवसेनेने निवडणुकीपासून पळवाट काढायची तयारी सुरू केली आहे.

कोरोनाचं कारण देऊन मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दोन वर्षांनी पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून निवडणूक आयोगानं ठरवलं आणि निवडणूक वेळेतच घेतली तरी भाजप पूर्ण तयार आहे असे सांगून शेलार म्हणाले, सामनामध्ये दररोज डायलॉगबाजी केली जाते. आज आम्हीही शिवसेनेला त्यांच्याच भाषेत सांगतो, बंदूक भी तेरी, गोली भी तेरी, दिन-तारीख भी तेरी, दिन कहे दिन, शाम कहे शाम, शिवसेना को परास्त करने भाजप तयार है.

शेलार म्हणाले, जनगणनेचं कारण देऊन मुंबईतील वॉर्ड रचना बदलण्याचं कारस्थान सत्ताधारी शिवसेनेकडून रचले जात आहे. कोरोनाच्या नावाखाली अनेक गोष्टी सुरू आहेत. २०११ च्या जनगणेनुसार २०१७ ची प्रभागरचना झाली, मग आता त्याच जनगणनेनुसार २०२२ मध्ये प्रभागरचना का? जनगणना करता येणार नाही, नव्याने मतदार नोंदणी करताना जास्त वेळ लागेल, असा त्यामागचा डाव आहे. जितके करता येईल तितकं निवडणूक पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

Shiv Sena’s conspiracies for Mumbai Municipal Corporation, vandalism in 30 wards, allegations of Ashish Shelar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण