विशेष प्रतिनिधी
मुंबई – मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवर ठाकरे – पवार सरकारवर पत्रकार परिषदेत कठोर प्रहार करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अचानक सिल्वर ओकवर जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. BIG BREAKING NEWS; Devendra fadanavis meets sharad pawar at silver oak in mumbai
स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच पवारांच्या घरात जाऊन भेट घेतल्याचा फोटो फेसबुकवर शेअर केला. हा फोटो शेअर केल्याबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
Met Former Union Minister & Senior leader Shri Sharad Pawar ji at his residence in Mumbai this morning. This was courtesy meeting.माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/eqjabCHMh7 — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 31, 2021
Met Former Union Minister & Senior leader Shri Sharad Pawar ji at his residence in Mumbai this morning. This was courtesy meeting.माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/eqjabCHMh7
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 31, 2021
छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांसकट विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवी समीकरणे जूळत असल्याच्या बातम्या चालू झाल्या. यावर जोरदार चर्चा सुरू असतानाच आज अचानक देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याच बरोबर राज्यात नव्या समीकरणाचीही चर्चा सुरू झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App