ऐन रब्बीच्या वेळी महावितरण कंपनीने केवळ ८ तासच वीज देण्याचा नवीन निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.Aurangabad: Only 8 hours power supply at the mouth of Ain Rabbi
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावरच केवळ ८ तास वीजपुरवठा देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.रब्बी पिकांची जोपासना करण्यासाठी यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. त्यामुळे उत्पादन वाढेल अशी आशा आहे. मात्र, आता ऐन रब्बीच्या वेळी महावितरण कंपनीने केवळ ८ तासच वीज देण्याचा नवीन निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
दरवर्षी रब्बी हंगामाला सुरवात झाली की, महावितणकडून हा वीज कमी देण्याचा निर्णय घेतला जातो. सिंगल फेज योजनेमुळे गावातील विद्युत पुरवठा हा सुरळीत होतो. पण कृषीपंपाचा पुरवठा हा दोन तासांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी असताना देखील अडचणी निर्माण होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App