प्रतिनिधी
औरंगाबाद – लाकडी खेळण्यांच्या नावाखाली पंजाबमधून तलवारी, सुरे आणि अन्य हत्यारे मागवूनन विकण्याचा दानिश खानचा खेळ औरंगाबादेत जूनाच आहे. मात्र तो आता पकडला गेला आहे. aurangabad – irfan khan alis danish khan arrested for purchesing swords and other wepons in the name of wooden toys
इरफान खान उर्फ दानिश अयूब खान या आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी, आरोपीने यापूर्वी केलेल्या खेळाची माहिती न्यायालयाला दिली. त्याने आधीच ऑनलाईन मागविलेल्या तलवारी आणि अन्य हत्यारे यांची औरंगाबाद शहरातल्या तसेच अन्य शहरांमध्ये विविध ठिकाणी विक्री केली असून त्या अजून जप्त करायच्या आहेत. तसेच, इरफान उर्फ दानिश हा अशा प्रकारे आणखी कोणत्या शहरांमधून ऑनलाईन खरेदी करतो आणि त्याच्या या गुन्ह्यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे याचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
-४१ तलवारी जप्त
औरंगाबादमध्ये कुरियरने मागविलेल्या ४१ तलवारी, सहा कुकरी, दोन गुप्त्यांसह एक माल वाहतूक करणारी गाडी असा सुमारे २ लाख ४५ हजार २५० रुपयांचा ऐवज पोलिसांनी काल जप्त केला. ही हत्यारे मागविणाऱ्या इरफान खान ऊर्फ दानिश अय्युब खान (२०, रा. जुना बायजीपुरा) याला रविवारी पहाटे बेड्या ठोकल्या. तेव्हा त्याचे अनेक कारनामे बाहेर आले.
बायजीपुरा येथील इंदिरानगरच्या इरफान ऊर्फ दानिश खानच्या नावावर हिना किराणा स्टोअर्स या पत्त्यावर कुरियरने अमृतसर येथील अरमान इंटरप्राईजेसकडून लाकडी खेळण्याच्या नावाखाली तलवारी येत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली होती. त्यांनी शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सेव्हन हिल उड्डाण पुलाखाली पथकाने सापळा रचून कुरियरच्या सामानाची वाहूतक करणारी गाडी (क्र. एमएच-२० ईजी-११०७) ताब्यात घेऊन झडती घेतली.
त्यामध्ये दानिश खानच्या नावाचे पार्सल आढळले. हे पार्सल अमृतसर येथून मागवण्यात आले होते. त्या पार्सलवर लाकडी खेळणी असा उल्लेख होता. पार्सल फोडून पाहिले असता त्यात ५ तलवारी आढळून आल्या. त्यानंतर काल दुपारपासूनच पुंडलिकनगर पोलिसांनी दानिशचा शोध घेऊन रात्री त्याला ताब्यात घेतले. चौकशीत इरफान खान याने दानिश या नावाने पार्सल मागविल्याचे समोर आले. इरफान ऊर्फ दानिशकडून आणखी हत्यारे जप्त करण्यात आली.
त्याने आधी अनेकदा अशीच लाकडी खेळण्यांच्या नावाखाली हत्यारे खरेदी उद्योग केल्याचेही उघड झाले आहे. त्याचे नेटवर्क मोठे आहे. पोलीस आता त्याचा तपास करण्याच्या मागे लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App