Aamir Khan Divorce : घटस्फोटानंतर आमिर – किरण यांची पहिली प्रतिक्रिया, चाहत्यांना दिला हा संदेश

Aamir Khan Divorce First Reaction of Kiran rao and Aamir in Paani Foundation Program

Aamir Khan Divorce :  बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट होत असल्याचे शनिवारी जाहीर केले. त्यांतर त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. घटस्फोटाच्या या घोषणेनंतर आज दोघांनीही पानी फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात एकत्र येत प्रतिक्रिया दिली आहे. पानी फाऊंडेशनच्या झूम कॉलमध्ये सहभागी होत दोघांनी घटस्फोटावर पहिली प्रतिक्रिया दिली. दोघांनी यावेळी वेगळं राहूनही खुश असून एकमेकांना साथ देण्याविषयी सांगितले. किरण आणि आमिर खान यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपली प्रतिक्रिया दिली आहे. Aamir Khan Divorce First Reaction of Kiran rao and Aamir in Paani Foundation Program


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट होत असल्याचे शनिवारी जाहीर केले. त्यांतर त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. घटस्फोटाच्या या घोषणेनंतर आज दोघांनीही पानी फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात एकत्र येत प्रतिक्रिया दिली आहे. पानी फाऊंडेशनच्या झूम कॉलमध्ये सहभागी होत दोघांनी घटस्फोटावर पहिली प्रतिक्रिया दिली. दोघांनी यावेळी वेगळं राहूनही खुश असून एकमेकांना साथ देण्याविषयी सांगितले. किरण आणि आमिर खान यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पाणी फाउंडेशनच्या या व्हिडीओमध्ये आमिर खान म्हणाला की, “काल तुम्ही सर्वांनी माझ्या आणि किरणच्या घटस्फोटाविषयी ऐकलं. काही जणांना आमच्या निर्णयामुळे वाईट वाटलं असेल. पण आम्ही सदैव एकत्र राहू. आम्ही पानी फाउंडेशनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहणार आहोत.

आमिर पुढे म्हणाला की, जसा आझाद हा आमचा मुलगा आहे, त्याचप्रमाणे पानी फाऊंडेशनही आमच्या मुलासारखं आहे. आपण एकत्र पानी फाऊंडेशन चालवत आहोत. याक्षणी आम्ही शहराबाहेर आहोत, परंतु आम्ही आमच्या कामामुळे तुम्हाला कायम आनंदित ठेवू. दुसरीकडे, किरण रावने म्हटलं की, सध्या आम्हाला तुमचे प्रेम आणि पाठिंब्याची आवश्यकता आहे. तुम्ही सर्वांनी आमच्यासोबत राहावं. प्रत्येक वेळी आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी आमची इच्छा आहे. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळेच पानी फाउंडेशन पुढे जात आहे.

घटस्फोटावेळीही दोघांचं संयुक्त निवेदन

आमिर खान आणि किरण राव यांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, “15 वर्षाच्या सुंदर संसारामध्ये आम्ही सुख, समाधान, आनंदाचे अनेक क्षण अनुभवले. विश्वास, आदर आणि प्रेम यामुळे आमचे संबंध सुंदर होत गेले. आता एक पती आणि पत्नीची जबाबदारी दूर सारुन आम्ही पालक आणि एक परिवाराच्या माध्यमातून आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता, आता त्याची अंमलबजावणी करण्याची योग्य वेळ आली आहे असं आम्हाला वाटतं.”

Aamir Khan Divorce First Reaction of Kiran rao and Aamir in Paani Foundation Program

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण