विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या गृहमंत्रीपदासारख्या सार्वजनिक सेवेत असताना देशमुख यांनी खूप संपत्ती जमविली. त्यांच्या संपत्तीचे उत्पत्तीस्थान अद्यापही अस्पष्ट आहे. आर्थिक गैरव्यवहारामागे अनिल देशमुख यांचाच हात होता. या कटाचे तेच मुख्य सूत्रधार होते. संपत्ती जमविण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला,Anil Deshmukh is the main facilitator in financial malpractice, ED informed the High Court
असा आरोप ईडीने उच्च न्यायालयात गुरुवारी केला. हृषिकेश देशमुख, सचिन वाझे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याबरोबर आर्थिक गैरव्यवहाराच्या रचलेल्या कटाचे मुख्य सूत्रधार अनिल देशमुखच आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या अनुकूल बदल्या आणि नियुक्त्या करण्यासाठी देशमुख यांनी आपला प्रभाव वापरला,
असाही आरोप तपास यंत्रणेने केला. देशमुख यांनी केलेला अर्ज फेटाळावा, अशी विनंती ईडीने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला केली. देशमुखांची सुटका करण्यात आली तर ते तपासावर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे, असे ईडीने म्हटले आहे.
देशमुख यांना ईडीने २ नोव्हेंबर रोजी अटक केली. भ्रष्टाचार प्रकरणी सध्या ते सीबीआय कोठडीत आहेत. काही दिवसांपूर्वीच विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने देशमुख यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावर ईडीने उत्तर दाखल केले. न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठापुढे शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App