अजितदादांच्या नाराजी आणि दबावाच्या बातम्या खऱ्या, की माध्यमांनीच सोडलेल्या पुड्या?? l marathi news

Ajit pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अजितदादांच्या नाराजी आणि दबावाच्या बातम्या खऱ्या की माध्यमांनी सोडलेल्या पुड्या??, असा सवाल तयार झाला आहे. Ajit pawar upset shinde fadnavis in new delhi to meet BJP high command

कारण राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते त्यासंदर्भात लाखोला असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केला. अजितदादांची तब्येत बरी नसल्यामुळे ते मंत्रिमंडळ बैठकीला येऊ शकले नाहीत. त्याचे पूर्वकल्पना त्यांनी मला दिली होती, असे शिंदेंनी स्पष्ट केले, तरी देखील अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या माध्यमांनी त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने चालविल्या.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचाही त्यासाठी हवाला दिला गेला. ट्रिपल इंजिन सरकार मधले एक नाराज इंजिन आज देवेंद्र फडणवीस यांना भेटले. म्हणजे सरकार नक्की कोण चालवतेय, ते पाहा, असे वक्तव्य करून सुप्रिया सुळे यांनी करून अजित पवार नाराज असल्याचे सूचित केले. त्यावरूनच माध्यमांनी अजितदादांच्या नाराजीच्या आणि पालकमंत्री पदांचे प्रश्न सोडविण्यासाठी दबावाच्या बातम्या चालविल्या.

अजितदादा नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे अचानक दिलेला रवाना झाले. तिथे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पिणार्डा यांच्याशी राजकीय खल करणार असल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत.पण आत्तापर्यंत शिंदे – फडणवीस सरकार मधल्या नाराजीच्या अथवा दबावाच्या जेवढ्या म्हणून बातम्या माध्यमांनी दिल्या त्यानंतर काही कालावधीत त्या बातम्या खोट्या ठरल्याचा अनुभव आहे. अजित पवार हे शरद पवारांपासून बाजूला होऊन ते उपमुख्यमंत्री होणार याची साधी भनक देखील माध्यमांना लागली होती नव्हती. उलट अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद हवे आहे, अशा बातम्या मराठी माध्यमे चालवीत होती. प्रत्यक्ष त्या खोट्या ठरवून अजित पवार शिंदे – फडणवीस सरकार मध्ये तिसऱ्या क्रमांकाचे पद घेऊन उपमुख्यमंत्री झाले.

आता देखील अजित पवारांच्या नाराजीच्या बातम्या माध्यमांनी दोन आधारांवर दिल्या आहेत. अजितदादांच्या मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांची पालकमंत्री पदे हवी आहेत, तसेच स्वतः अजितदादांना पुण्याचे पालकमंत्री पद हवे आहे. तसेच सुप्रिया सुळे यांचे सूचक विधान हे ते दोन आधार आहेत. पण त्यामुळेच नाराजी आणि दबावाच्या बातम्या खऱ्याच ठरतील याची कुठलीही अनुभवाअंती गॅरंटी नाही.

Ajit pawar upset shinde fadnavis in new delhi to meet BJP high command

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात