प्रतिनिधी
मुंबई : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 रुग्णांच्या मृत्युची घटना सरकारने अतिशय गांभीर्याने घेतली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि संबंधित सचिव आणि अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी गेले आहेत. त्यामुळे चौकशीअंती दोषींवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. nanded government hospital news 127 medicine stored | Marathi News
127 प्रकारच्या औषधांचा साठा होता
एकनाथ शिंदे म्हणाले की, या घटनेसंदर्भात प्राथमिक माहिती घेतली असता रुग्णालयात 127 प्रकारच्या औषधांचा साठा उपलब्ध होता. डॉक्टर आणि वैद्यकीय पथकही हजर होते. विशेष म्हणजे त्याउलट त्या रुग्णालयात नवीन औषधी खरेदीसाठी 12 कोटी रुपयांचा निधीला देखील मान्यता दिलेली होती.
परंतू रुग्णांच्या मृत्यूची घटना अतिशय गंभीर आहे. दुर्दैवी आहे. झालेल्या संपूर्ण घटनेला सरकारने गांभीर्याने घेतले आहे. वैद्यकीय मंत्री व अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तपासणी करत आहेत. चौकशीअंती या प्रकरणात कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मृत्यू कशाने झाले त्यात मी पडत नाही संबंधित मृत्यू झालेल्या रुग्णांबाबत आम्ही प्राथमिक माहिती घेतली आहे. यात विशेष करुन काही वयोवृद्ध लोक होते, तर लहान बालके ही प्री-टर्म होती. परंतू त्यात मी आता पडू इच्छित नाही. चौकशीअंती जे काही समोर येईल. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मंत्रिमंडळांची बैठक संपन्न
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळातील बैठकीबद्दल सविस्तर माहिती दिली. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ,अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी 27 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ यासह अनेक निर्णयांबाबत त्यांनी माहिती दिली.
नांदेड, संभाजीनगरमधील रुग्णांच्या मृत्यूंची केंद्राकडून दखल
नांदेडसह छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूंची दखल आता केंद्र सरकारने घेतली आहे. रुग्णांच्या मृत्यूबाबत रुग्णालय प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे. तसेच, राज्यातील शासकीय रुग्णालयांना केंद्र सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती मदत दिली जाईल, असे आश्वासनही डॉ. भारती पवार यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App