Ajit Pawar बॅगा सगळ्यांच्याच तपासल्या; पण फक्त अजितदादांच्या बॅगेत लाडू – चकल्या सापडल्या!!

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  Ajit Pawarनिवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगा सगळ्यांच्याच तपासल्या, पण अजितदादांच्या बॅगेत लाडू – चकल्या सापडल्या!! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बॅगा तपासणी वादात सापडली असताना हा भन्नाट किस्सा घडला!!

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बॅगा दोनदा तपासल्यावर महाराष्ट्रात विरोधकांनी वाद निर्माण केला. शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी त्यावर आक्षेप घेतले. तुम्ही फक्त विरोधकांनाच टार्गेट करताय, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाने त्यावर प्रत्युत्तर दिले. Ajit Pawar

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajit Pawar (@ajitpawarspeaks)

नंतर नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या पण बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्या. यापैकी कुणाच्या बॅगांमध्ये आक्षेपार्ह वस्तू आढळल्या नाहीत.

पण आज निवडणूक अधिकाऱ्यांनी बारामतीत अजितदादांच्या हेलिकॉप्टर मध्ये बॅगा तपासल्या. त्यावेळी त्यांना बॅगांमध्ये काही सापडले नाही, पण डब्यांमध्ये लाडू – चकल्या सापडल्या. काही खाद्यपदार्थ सापडले. पाणी आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या सापडल्या. त्यावेळी हेलिकॉप्टर मध्ये बसूनच अजितदादांनी खा बाबा खा!!, असे म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांची फिरकी घेतली.

Ajit Pawar Bags checking in helicopter

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात